जिल्हयातील गावे स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील ः पालकमंत्री
पुणे, दि. 03 - दौंड तालुक्यातील आय.एस.ओ. मानांकन प्राप्त ग्रामपंचायत कुसेगाव येथील 5 कोटी 25 लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे उदघाटन,भुमीपूजन व लोकार्पण सोहळा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते संपन्न झाला.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, गावातील शाळा, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता तसेच तरुणांना व महिलांना गावात रोजगार उपलब्ध झाल्यास शहराकडे येणारे लोंढे थांबतील. यासाठी जास्तीत जास्त निधी शासनामार्फत उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन दिले. अधिकारी व लोकप्रतिनीधी यांनी सर्वांना बरोबर घेऊन आणि समन्वयाने विकास कामे करावीत अशी सूचना केली. रस्ते हे विकासाची गंगा आहे. रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री सडक योजने मार्फत जास्तीत जास्त निधी कुसेगावला उपलब्ध करुन देण्यात येईल. गावाचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. पुणे जिल्हयातील सर्व गावे स्वयंपूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुसेगावचे सरपंच मनोज फडतरे यांनी केले. मागील वर्षी दुष्काळ असताना पालकमंत्र्यांनी कुसेगावला पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले.त्याच प्रमाणे कुसेगाव येथील रस्त्यांकडे पालकमंत्र्यांनी वैयक्तीक लक्ष देवून निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
कार्यक्रमास दौंडचे आमदार राहूल कूल, तहसिलदार विनोद साळुंके, गटविकास अधिकारी संतोष हराळे, जिल्हा परिषद सदस्या वैशाली वाबळे,कार्यकारी अभियंता डी.एन.कुलकर्णी, पुणे जिल्हा मार्केट कमिटी चेअरमन दिलीप खैरे तसेच माजी आमदार रमेश आप्पा थोरात व कुसेगाव येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.