Breaking News

लाखोंच्या उपस्थितीत झाली काठ्यांची महापुजा,सात लाख भाविकांनी घेतले दर्शन

। शासकीय महापूजा व महाआरती झाल्यानंतर मिरवुणक 

अहमदनगर, दि. 16 - प्रति जेजुरी लौकीक असलेल्या व राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पिपळगाव रोठा ( ता पारनेर ) येथील श्री क्षेत्र कोरठण  खंडोबा देवस्थानला आज यात्रेच्या शेवटच्या व मुख्य दिवशी लाखो भाविकांच्या उपस्थितीत  बेल्हे ( जि पुणे ) व ब्राम्हणवाडा येथील मानाच्या काठ्यांची  मिरवणुक होऊन शासकीय महापुजा व महाआरती झाल्यानंतर या काठ्यांनी कळस व देवदर्शन घेतल्यानंतर इतर गावच्या काठ्यांची मिरवणुक होऊन तीन दिवस  चाललेल्या वार्षिक यात्रोत्सवाची सांगता झाली दरम्यान यात्राकाळात सुमारे सात लाख भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले
नगर जिल्हयासह ठाणे पुणे नाशिक औरंगाबाद मुंबई येथून तसेच कोकण ,गुजरात मधूनही भाविक कोरठणला आले होते सर्वाधिक भाविक पुणे जिल्ह्यातुन आले  होते यात्रेच्या निमित्ताने खोबरे भंडारा खेळणी मिठाई कृषी औजारे मनोरंजन महिला उपयोगी व इतर साहित्य विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल झाली  पहाटे श्री  खंडोबास मंगलस्नान घातल्यानंतर सकाळी तुषार ठुबे ,ज्योती ठुबे ,महादेव ढोमे ,सुलोचना ढोमे यांच्या हस्ते खंडोबाची पुजा व आरती करण्यात यावेळी देवस्थानचे  अध्यक्ष अ‍ॅड पांडुरंग गायकवाड व विश्‍वस्त भाविक उपस्थित होते यानंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले यात्रेचा शेवटचा दिवस असल्याने भाविकांच्या  मोठ्या रांगा लागल्या होत्या सकाळी 9 वा खंडोबाच्या चांदीच्या पालखीसह अळकुटी बेल्हा साकुरी कांदळी वडगाव माळवाडी राजापुर सावरगाव घुले कासारे कळस  येथील मानाच्या पालख्यांची मिरवणुक निघाली दुपारी 12 वाजेच्या दरम्यान पालखी सोहळा मिरवणुकीने मंदिरासमोर आल्यानंतर देवस्थान व प्रशासनाने  पालख्याचे स्वागत केले यावेळी यात्रेत भाविकांच्या गर्दीचा उच्चांक झाला
दुपारी 1 वा यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या बेल्हे व ब्राम्हणवाडा येथील मानाच्या काठ्यांची शाही मिरवणुक सुरू झाली दुपारी अडीच वा दोन्ही काठ्या मंदिराच्या  पायर्‍यांवर  आल्यानंतर शासनाच्या वतीने तहसिलदार भारती सागरे व पोलिस निरिक्षक दिलीप पारेकर यांनी शासकीय महापुजा केली यावेळी देवस्थानचे अध्यक्ष  गायकवाड ,उपाध्यक्ष रामदास मुळे ,सरपंच अशोक घुले यांच्यासह लाखो भाविकांचा जनमुदाय उपस्थित होता यानंतर काठ्यांची महाआरती होऊन काठ्या  मानकर्यानी एकमेकांचा सत्कार केला ब्राम्हणवाडा काठीने गाभार्यात जाऊन देवदर्शन घेतले यानंतर बेल्हे येथील काठीने कळस दर्शन घेतले यानंतर इतर गावच्या  मानाच्या काठ्यांच्या मिरवणुका झाल्या व यात्रेची सांगता झाली.        यात्रा उत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल प्रांताधिकारी गोविंद दाणेज तहसिलदार भारती  सागरे पोलिस निरिक्षक दिलीप पारेकर देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड पांडुरंग गायकवाड विश्‍वस्त ग्रामस्थ यांनी भाविक प्रशासकिय कर्मचारी स्वयंसेवक यांचे आभार  मानले.