Breaking News

16 व्या पारनेर मॅरेथॉन स्पर्धेचे 21 जानेवारीला आयोजन

अहमदनगर, दि. 16 - येथील नागेश्‍वर मित्र मंडळाच्यावतीने घेण्यात येणार्‍या 16 वी राज्यस्तरीय पारनेर मॅरेथॉन स्पर्धा शनिवारी 21 जानेवारीला होणार  असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सखाराम बोरूडे व उपाध्यक्ष अनिकेत रमेशऔटी  यांनी दिली. सात गटांमध्ये होणार्‍या  या स्पर्धेसाठी सुमारे 75 हजार  रूपयांची बक्षिसे आहेत. लेक वाचवा, देश वाचवा हा संदेश या स्पर्धैतुन दिला जाणार आहे.
पारनेर येथे नागेश्‍वर मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी  स्वामी विवेकानंद जयंती, सुभाषचंद्र बोस जयंती, राष्टीय युवा दिनानिमीत्त पारनेर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन  करण्यात येते. राज्यारात या स्पर्धे विषयी उत्सुकता असते.शनिवार सकाळी नउ वाजता पारनेर बाजारतळा पासुन या पारनेरमॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.  स्पर्धेसाठी सभापती गणेश शेळके, राजेंद्र शिंदे प्रतिष्ष्ठाण, पारनेर तालुका, प्रशांत गायकवाड, सभापती बाजार समीती, पारनेर, पराशर ऋषी पतसंस्थेचे अध्यक्ष व  नगरसेवक दत्तात्रय कुलट व व्यवस्थापक शहाजी  थोरात, भैरवी गृपचे अध्यक्ष दशरथ बोरूडे, हॉटेल गौरव गार्डन, भालेकर बंधु, उदयोजक निलेश खोडदे,  मातोश्री कन्सट्रकसशन्स चे दत्तात्रय अंबुले, प्रसाद अंबुले, प्रताप अंबुले व पुणे येथील महिला गृहउदयोग  लिज्जत पापड हे सहप्रायोजक राहणार आहेत.
स्पर्धेमध्ये पहिली ते चौथीपर्यंत मुले ,मुली एक गट  व पाचवी ते सातवी असे दोन गटात फकत पारनेर तालुकयातील शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विदयार्थ्यांनाच  प्रवेश दिला जाणार आहे. आठवी ते दहावी मुले मुली या गटात नगर जिल्हयातील शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विदयार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे. तर खुला पुरूष  गट असुन यामध्ये राज्यारातील स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार आहे. शालेय गटातील स्पर्धकांना पालकाचे संमतीपत्रक व मुखयाध्यापका च्या संमती शिवाय प्रवेश  मिळणार नाही. स्पर्धेसाठी आनंद मेडीकल फोैडैशनचे इंदीरा गांधी नर्सिंग कॉलेज ची रूग्णवाहिका व परीचारीका, अत्यावश्यक सेवा असणारी 108 रूग्णवाहिका  तैनात करण्यात  येणार असुन पारनेर महाविदयालयाचे राष्ट्रीय छात्र सेनेचे विदयार्थी संरक्षणाची बाजु साभांळणार आहेत. स्पर्धेसाठी पारनेर नगरपंचायत, पारनेर  पोलिस ठाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग,आरोग्य व शिक्षण विभाग व पारनेर ग्रामस्थांचे सहकार्य मिळणार आहे.     या स्पर्धेसाठी सहाागी होण्यासाठी कल्याण  थोरात- 8855897111, गणेश कावरे-9403192220,अनिकेत औटी- 9730868022, डॉ.नरेंद्र मुळे 9404977555 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन  नागेश्‍वर मित्र मंडळाचे प्रमुख सचिन शिंदे, नजीर तांबोळी, सचिन बडवे, समीर शेख, सतिष म्हस्के, राजेंद्र म्हस्के, सुभाष कावरे, सुनील कावरे, अक्षय देशमाने,  हौशीराम वाढवणे, दत्ता वाटमारे, वैभव बडवे, सारंग बोरूडे,मनोज गंधाडे,भास्कर बोरूडे, नरेंद्र शिंदे,दिगंबर शिंदे,नंदकुमार खेडेकर, विजय इंगळे, सचिन वाटमारे,   किरण शिंदे, आशिष औटी, प्रताप अंबुले, प्रसाद अंबुले, सुहास मोढवे, वैभव पठारे, गणेश डेरे, किरण पठारे, प्रमोद गोळे, सुभाष बोरूडे, दत्ता शेरकर, उदय  शेरकर, शंतुन देशमुख  यांनी केले आहे. अण्णा हजारे यांच्या निवृत्तीवेतनातुन विजेत्यांना चषकजेष्ष्ठ  समाजसेवक अण्णा हजारे यांच्या निवृत्तीवेतनातुन दरवर्षी  पारनेरमॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्या खेळाडुंना चषक देण्यात येत असुन सुमारे सातगटातील पस्तीस जणांना हे चषक ्रप्रदान केले जातात.स्पर्धेतील विजेत्याखेळाडुंना  सुमारे 75 हजार रूपयांची रोख बक्षिसेही स्पर्धेमध्ये देण्यातयेणार असुन या स्पर्धेमुळे पारनेर त ालुकयातील अनेक विदयार्थ्यांना शालेयस्पर्धांमध्ये राज्य पातळीवर  खेळण्याची संधी मिळत आहे.