Breaking News

आळंदीतील शिवसेनेची महिला उमेदवार बेपत्ता

पुणे, दि. 06 - आळंदी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार्‍या शिवसेनेच्या पराभूत उमेदवार भाग्यश्री रंधवे 16 दिवसांपासून गायब आहेत. भाग्यश्री रंधवे या 20 डिसेंबरला बेपत्त झाल्या होत्या.
नगरपालिकेच्या दुसर्‍या टप्प्यात पुणे आणि लातूरमध्ये 14 डिसेंबर मतदान झालं होतं. त्याचा निकाल 15 डिसेंबर रोजी जाहीर झाला आहे. यामध्ये आळंदी नगरपालिकेचाही समावेश होता. आळंदीच्या एकूण 18 जागांपैकी 11 जागा भाजप, 5 जागा शिवसेना आणि 2 जागा शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवाराला मिळाल्या होत्या. परंतु नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजपच्या वैजयंता उमरगेकर आणि भाग्यश्री रंधवे यांच्या झाली होती. मात्र यामध्ये भाग्यश्री रंधवे 35 मतांनी पराभूत झाल्या होत्या. निकालाच्या पाच दिवसांनी त्या गायब झाल्या होत्या. तेव्हापासून आजपर्यंत त्या बेपत्ता आहेत. आळंदी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे.