Breaking News

करंजीच्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

अहमदनगर, दि. 30 - पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील श्री नवनाथ विद्यालयातील दोन खेळाडूंची रोप स्किपिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.
विद्यालयातील कुमारी तृप्ती शिंदे व मोनिका काळे या दोन मुलींना आता रोप स्किपिंग स्पर्धेसाठी हंगेरी येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार  आहे. तसेच राज्यस्तरीय फूटबॉल टेनिस या स्पर्धेत अभिजीत अकोलकर, अभिषेक गुगळे, तौसिफ शेख यांनी यश मिळवून रौप्यपदक मिळविले आहे. आता त्यांना  पंजाब येथे राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे तर राज्यस्तरीय रोपस्किपिंग स्पर्धेसाठी 13 खेळाडूंची निवड झाली असून, यामध्ये वाजेद सय्यद यास  कास्यपदक तर पांडुरंग खोमणे यास सुवर्णपदक मिळाले आहे. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक व्ही.एच. गोबरे, बी.एन.वांढेकर, एस.एम.अकोलकर यांचे मार्गदर्शन  लाभले. गुणवंत खेळाडूंचे प्राचार्य शिवाजी आठरे, सर्व शिक्षक, गावचे सरपंच नसिम शेख, उपसरपंच शरद अकोलकर,मिर्झा मनियार,सुभाष कोलकर,जालिंदर  वामन,अभय गुगळे,नामदेव मुखेकर,अजहर पठाण,विजय सुतार,प्रकाश शेलारयांच्यासह सर्व ग्रामस्थ व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुखेकर, शिवसेना  तालुका प्रमुख रफिक शेख, माजी सरपंच सुनील साखरे, छानराज क्षेत्रे, यांनीही या खेळाडूंचे अभिनंदन केले.