Breaking News

भारतीय दलित महासंघाचा जि.प.निवडणुकीसाठी भाजपाला पाठिंबा

सुनील उमाप यांच्यासह तालुकाध्यक्षांच्या उपस्थितीत निर्णय 

अहमदनगर, दि. 30 - राज्यात भारतीय जनता पार्टी स्वबळावर आपले उमेदवार उभे करणार असून त्यामध्ये शंभर टक्के यश मिळणार आहे.  भाजपाला  छोटा-छोट्या पक्षांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळण्यास प्रारंभ होत आहे.नगर मध्ये भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष सुनील उमाप व  पदाधिकार्‍यांनी पालक  मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर आपल्या पाठिंब्याचे पत्र सुपूर्त केले आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड ,जिल्हा सिरचिटणीस प्रसाद  ढोकरीकर, तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग,दलित महासंघाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष संदीप नेटके,उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेश शिरसाठ,नगर तालुकाध्यक्ष शिवाजी  जाधव,पाथर्डी तालुकाध्यक्ष लक्ष्मण पेटारे,राहुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब नेटके,कर्जत तालुकाध्यक्ष महेश सकट,श्रीरामपूर तालुकाध्यक्ष भाग्यवंत नवगिरे,पारनेर  तालुकाध्यक्ष जयवंत खरात व अकोला तालुकाध्यक्ष विजय खरात उपस्थित होते.
  यावेळी बोलताना पालकमंत्री ना.प्रा.राम शिंदे म्हणाले की,देशात व राज्यात परिवर्तन झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या शासनाने सर्वसामान्य घटकांना न्याय  देण्याची भूमिका अंगिकारली. गेल्या दोन वर्षात शेतकर्‍यांना सन्मानाने जगता यावे म्हणून पंतप्रधान पीक विमा योगन सुरु केली. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर  बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्य पासून देशातील नागरिकांना प्रेरणा मिळावी म्हणून आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  झाले.त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपूजनही पार पडले आहे.सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला  दिलेल्या आश्‍वांसनांची पूर्ती केली आहे. आता जिल्ह्यातही आगामी निवडनिकताही भारतीय जनता पार्टी ’मिशन 40प्लस  सध्या करत जिल्हा परिषद व पंचायात  समिती मध्ये सर्व सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळून देणार आहे. या लढ्यासाठी भारतीय दलित महासंघ नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत.  यावेळी जिल्हाध्यक्ष  प्रा.भानुदास बेरड म्हणाले की भारतीय जनता पार्टी हि पार्टी विथ डिफरेन्स विचारांची आहे.येणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो .त्यामुळे आता  भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी जुळणार्‍या सर्वात छोट्या पक्षांना बरोबर घेऊन आगामी सर्वच निवडणुकांमध्ये यश प्रस्थापित करेल.