Breaking News

स्नेहसंमेलन म्हणजे बालकलारांची ऊर्जाकेंद्र- बालकृष्ण धायगुडे

लातूर (प्रतिनिधी), दि. 30 - स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांना उपजत कलागुणांचा आविष्कार करण्याची संधी मिळते.यातूनच  आपल्यातील कलेची जाणीव  होऊन ती जोपासण्याची प्रेरणा मिळते.त्यामुळे शाळांतील स्नेहसंमेलने ही बालकलाकारांची ऊर्जाकेंद्र आहेत, असे प्रतिपादन जेष्ठ नाट्य अभिनेते बालकृष्ण धायगुडे यांनी केले.ते देशिकेंद्र विद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रवीण कर्पे होते.यावेळी व्यासपीठावर चित्रकार राजाभाऊ बनाळे, कलाकार सिद्धेनश्‍वर बिराजदार,  पर्यवेक्षक एस.एम. आग्रहारकर,एस.एन. चौगुले,के.के. पैके, राजेन्द्र महाजन, विद्यार्थी संसदेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पुढे बोलताना धायगुडे म्हणाले, देशिकेंद्र विद्यालय हे लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नचा जनक असून  शिक्षणाबरोबरच कला व क्रिडा क्षेत्रातही राज्यात नावलौकिक मिळविला आहे.याबद्दल लातूरकर म्हणून मला अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक प्रवीण कर्पे यांनी प्रास्ताविक केले.या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन रमाकांत स्वामी यांनी केले.