Breaking News

विनोद राय बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

नवी दिल्ली, दि. 30 - सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयच्या नव्या प्रशासकांची नियुक्ती केली असून, भारताचे माजी महालेखापरिक्षक विनोद राय यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्याशिवाय इतिहासकार रामचंद्र गुहा, भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी आणि आयडीएफसीचे अध्यक्ष विक्रम लिमये यांची बीसीसीआयच्या प्रशाकीय पॅनेलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
विनोद राय  हे  महालेखापाल असताना, टूजी स्पेक्ट्रम घोटाळा आणि कोळसा घोटाळा बाहेर आला. देशाचे 11 वे महालेखापाल म्हणून त्यांनी कार्य पाहिलं. टूजी आणि कोळशा घोटाळा बाहेर काढल्यामुळेच ते चर्चेत होते. रामचंद्र गुहा यांचं गांधीनंतरचा भारत हे गाजलेलं पुस्तक आहे. इतिहासकार म्हणून देशभरात त्यांची ख्याती आहे. पर्यावरण, राजकीय, सामाजिक आणि विशेष म्हणजे क्रिकेट या विषयात त्यांचा दांडगा अभ्यास आहे. क्रिकेटचा इतिहास त्यांनी लिहिला आहे.