Breaking News

तारळीचे पाणी; खटाव तालुक्याला लाभ

कातरखटाव, दि. 16 (प्रतिनिधी) : कातरखटाव व बोंबाळे परिसरात तारळीचे पाणी आल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील  नाले, ओढे, बंधारे भरून वाहू लागल्याने यावर्षी ज्वारी, गहू, हरभर्‍याच्या पिकाच्या पाण्याचा प्रश्‍न सुटल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातवारण निर्माण झाले  आहे. 
खटाव तालुक्याच्या पूर्व भागाला 5-6 दिवसांपासून तारळीचे पाणी मिळत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे व हरणाई उद्योग समूहाचे शिल्पकार व  जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रणजितसिंह देशमुख यांच्या अथक प्रयत्नातून या पाण्याचा लाभ मिळाला. यावेळी कातरखटाव येथील कॅनॉलमध्ये पाण्याचे  पूजन केले. याप्रसंगी बोंबाळेचे माजी सरपंच दिनकर निंबाळकर, प्राचार्य आनंदराव घोरपडे, दत्ताशेठ बागल, आशिफ मुल्ला, डॉ. संतोष देशमुख, मारुती फडतरे,  मारुती निंबाळकर, आनंदराव जाधव, पोपट मोरे, संभाजी निंबाळकर, सत्यवान कांबळे उपस्थित होते. मुबारक मुल्ला यांनी प्रास्ताविक केले.