Breaking News

कराड शहर परिसरात जुगार अड्ड्यावर छापे; 17 जणांना अटक

कराड, दि. 16 (प्रतिनिधी) : सैदापूर (कृष्णा कॅनॉल, ता. कराड) येथे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापे टाकून मटका चालवणार्‍या बुकीसह 17 जणांना अटक  केली. कारवाईमध्ये 2 लाख 31 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शहर व तालुक्यात सुरू असलेल्या मटका अड्ड्यांशी संबंधित सूत्रे मुख्य बुकी मोईन अल्ताफ पठाण याच्या कृष्णा  कॅनॉल (सैदापूर) येथील भाड्याने घेतलेल्या कार्यालयातून हलविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी  शिवणकर यांच्या पथकाने रात्रीच्या पावणे दहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी मोईन पठाण याच्यासह 17 जण पोलिसांना आढळून आले. याप्रकरणी  पोलिसांनी मोईन अल्ताफ पठाण, सुहेल सलीम पटेल, जुबेर यासीन पटेल, जावेद अस्लम पठाण, राहुल शामराव पाटील (सर्व रा. मंगळवार पेठ, कराड), युनूस  महंमद तांबोळी (रा. गुरूवार पेठ कराड), सुनिल वासुदेव बेलवणकर (रा. शुक्रवार पेठ कराड), रमेश गजानन शिंदे (रा. शनिवार पेठ कराड), नदीम खालीद  बागवान (रा. भाजी मंडई कराड), असद युसूफ पठाण (दौलत कॉलनी कराड), मोहनकुमार बाळकृष्ण बुराडे (शिक्षक कॉलनी कराड), अय्याज शब्बीर शेख (रा.  नारायणवाडी, ता. कराड), विशाल हणमंत सावंत, तात्यासो हणमंत सावंत (दोघे रा. खोडशी, ता. कराड), फिरोज याकुब शेख, अनिल सदाशिव वीर (दोघे रा.  मलकापूर), रणजीत दिलीप मोरे (रा. आगाशिवनगर, ता. कराड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून मटका जुगारातील 17 हजार 80  रूपयांची रोकड व मटका जुगाराचे साहित्य व दुचाकी, चारचाकी गाड्या मिळून एकूण 2 लाख 31 हजार 780 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याबाबत कराड पोलीस ठाण्याचे हवालदार संतोष चव्हाण यांनी कराड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मटका बुकीला फ्लॅट भाड्याने देणार्‍या  संशयिताविरूध्द पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून फ्लॅट मालक शंकर कांतीलाल कणसे याला पोलिसांनी अटक केली आहे.