Breaking News

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आखाडा..!

कोण ठरणार 2017 निवडणूक आखाड्यातिल ‘सूल्तान’...?

बुलडाणा, दि. 12 - तालुक्यातील तिन जिल्हा परिषद गटां पैकी सद्यस्थितीत देऊळगाव मही जि प काँग्रेसकडे, तर सिनगाव राष्ट्रवादी च्या ताब्यात तर सावखेड  काँग्रेस च्या ताब्यात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे वेध इच्छुकांना लागले असून अनेकांनी गुपचूप मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.  निवडणूकीची तारीख कधी जाहीर होते, याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले होते.
जिल्हा परिषद आरक्षणामध्ये देऊळगाव मही जिल्हा परिषद गट नागरिकांचा खूला प्रवर्ग,सिनगाव साठी  नागरिकांचा मागास प्रवर्ग , तर सावखेडभोई गट  हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने तेथे दिग्गजांच्या नजरा लागल्या आहेत. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर अपवादानेच दिसणारी नेते मंडळी आता ग्रामीण  मतदार संघात सर्वत्र पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरताना दिसून येत आहे. विविध कारणाने पदाधिकारीही गावभेटीवर भर देताना दिसून येत आहेत. परिणामी  ऐन थंडीत जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण  तापू लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस भाजप, शिवसेना, काँग्रेस, आघाड्यांनीही उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात केली आहे. इच्छुकांची गर्दी पाहता कुणाला संधी द्यायची  हा प्रश्‍न पक्षातील प्रमुख नेत्यांना सतावत आहे. तर एकाच जागेसाठी अनेकजण इच्छूक पक्षांकडे उमेदवारी मागत आहे. देऊळ गाव मही सर्कल ची निवडणूक  नेहमीच रंगतदार ठरत असते. या सर्कल मधे बायगाव, डोढ्रा, वाकी खू.वाकी बू.चिंचखेड, शिवणी आरमाळ, धोत्रा, अंढेरा, पिंप्री,देऊळ गाव मही सहीत 12 गावाचा  समावेश आहे. मागिल निवडणूकत विद्यमान जि.प सदस्य सविता मूढे ह्या अपक्ष ऊमेदवार विजयी ठरल्या होत्या. भाजप सेनेला ऊम्मेदवार न मिळाल्याने त्यांनी  सविता मूढे यांना पाठीबा दिला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस चे समाधान श्रिधर शिंगणे यांना अंतर्गत गटबाजी मूळे पराभूत व्हावे लागले होते. काँग्रेस कडून भगवान  मूढे यांनी निवडणूक लढविली होती.
परंतू यावेळी काँग्रेस कडून विद्यमान जि.प सदस्य सविता मूढे ईच्छूक ऊम्मेदवार आहे तर भगवान मूढे हे भाजपा च्या वाटेवर असल्याचे चर्चा परिसरात  आहे मात्र त्यांचा भाजपा प्रवेश सद्या होऊ शकला नसल्याने ते कोणत्या पक्षाकडून दावेदार ठरतात याबाबत अजून स्पष्ट सांगता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाची ऊम्मेदवारी मिळावी म्हणून देऊळगाव मही येथील रियाज खान पठाण, समाधान श्रीधर शिंगणे, हे ईच्छूक असतांनाच यामध्ये राष्ट्रवादीतील यूवा नेतृत्व  म्हणून ओळख असलेले समाधान भिकाजी शिंगणे हे राष्ट्रवादी चे ऊम्मेदवार ठरू शकतात अशी विश्‍वसनीय सूत्राची माहीती आहे. शिवसेने कडून आमदार शशिकात  खेडेकर यांचे चिरंजीव श्रिनिवास खेडेकर, संभाजी शिंगणे, डाँ.दंदाले, दादाराव खार्डे, आदी इच्छूक उमेदवार आहेत.
संभाजी ब्रिगेड, एम आय एम रासप ही निवडणूकीच्या मैदानात ऊतरणार:- इतर पक्ष मजबूत असतानाच यंदाच्या निवडणूकीत संभाजी ब्रिगेड सह एम  आय एम, रासप चे ऊम्मेदवार ही निवडणूकीच्या मैदानात ऊतरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. जि.प साठी भाजपा तर्फे सतिश नागरे, सादीक भाई, एकनाथ  काकड, तर स्वाभिमानी शेतकरी संगटने तर्फे शेख जूल्फेकार, बबन चेके, रासपच्या वतिने भगवान बोंबले, एम आय एम च्या वतिने जूनेद कूरैशी आदी ईच्छूक  ऊम्मेदवार आहेत. तर संभाजी ब्रिगेड कडून अजून कोणतेच नाव समोर आलेले नाहि.
पंचायत समीती देऊळगाव मही:- देऊळगाव मही गण महीलासाटी आरक्षीत असून पत्निच्या ऊम्मेदवारीसाठी शिवसेना कडून भरत शिंगणे, तूळशिराम  पंडीत, ईच्छूक ऊम्मेदवार आहे. काँग्रेस कडून अनिल तूकाराम शिंगणे हे ईच्छूक ऊम्मेदवार आहे तर भाजपा च्या वतिने अरून कूटे, कैलास राऊत, गणेश  शेळके, आदी ईच्छूक ऊम्मेदवार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून सिद्दीक भाई कूरैशी,गजेद्र शिंगणे, शिवहरी शिंगणे, डाँ.मंगेश वायाळ ऊम्मेदवारी मिळवीण्यासाठी  ईच्छूक आहे.
दिग्गजांपूढे आव्हान
संभाजी ब्रिगेड , एम आय एम ची उडी :तालुक्यातील ग्रामीण भागात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचे मजबूत संघटन असल्याने आता जिल्हा परिषद, पंचायत समिती  निवडणूकीमध्ये भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याची शक्यता असून नगर पालिका निवडणुकीनंतर ग्रामीण भागातील वर्चस्वासाठी भाजप  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार लढत होणार असल्याचे चित्र आहे. एकंदरीतच या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपला सर्वात मोठे आव्हान आहे.
शहरातील नगर पलिकेच्या इतिहासात प्रथमच चुरशीच्या लढाईत भाजपचा नगराध्यक्ष निवडून आल्याने जिल्हा परिषद पंचायत समितीची उमेदवारी  मिळण्यासाठी इच्छुकांनी प्रयत्न चालविला आहे. तर संभाजी ब्रिगेड एम आय एम ही या निवडणूकीत प्रथमच उडी घेणार असल्याची खमंग चर्चा आहे. दरम्यान असे  झाल्यास निवडणुकीची समिकरणे बदलून जाणार असल्याने उमेदवार त्यादृष्टीनेही फील्डींग लावत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक दिनांक अर्ज भरणे - 27 जानेवारी ते 01 फेब्रुवारी, अर्ज छाननी - 02 फेब्रुवारी, मतदान 16 फेब्रुवारी,  मतमोजणी - 23 फेब्रुवारी हे स्पष्ट झाल्याने जि.प.पं.स निवडणूकीचा फड रंगात आला आहे.. देऊळगाव मही जि .प.  सर्कल चा 2017 चा सूलतान कोण ठरतो  हे जनता जनार्धन येणा-या काही दिवसात आपल्या दाखवेलच.