Breaking News

आदर्श विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात

बुलडाणा, दि. 12 - स्थानिक आदर्श विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य  देशमुख सर अध्यक्षस्थानी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे उपप्राचार्य गवई सर, संस्थेचे निरीक्षक भालेराव सर तर वक्ते जोगदंडे सर उपस्थित होते.
संगीत शिक्षक रसाळ सर व त्यांची चमु यांनी स्वागत गिताने पाहुण्यांचे स्वागत केले. श्रेया प्रताप इंगळे, केतन भराड, प्रणव माळशिंके यांनी प्रतिनीधीक  स्वरूपात जिजाऊ व विवेकानंदावर मनोगत व्यक्त केले. वक्ते ही जोगदंडे सर व भालेराव सरांनी राष्ट्रमाता व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील वेचक प्रसंग  गोष्टीरूपी सांगीतले अध्यक्षीय भाषणात मुख्यध्यापक देमुख सरांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनोद कुटे तर आभार प्रदर्शन शेळके सरांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदावंत सर व सर्व शिक्षक कर्मचारी बंधु  भगीनींचे सहकार्य लाभले.