Breaking News

मातृतिर्थ सिंदखेड राजात उसळला जिजाऊ भक्तांचा महासागर

बुलडाणा, दि. 12 - मातृतिर्थ सिंदखेडराजा येथील राजवाड्यात शिवरायांना हिंदवी स्वराज्याची प्रेरणा देणार्‍या राजमाता जिजाऊ यांना जन्मोत्सवानिमित्त पहाटे  सुर्योदयासमयी अभिवादन करण्यात आले. सुरुवातीला मंगलवाद्यांसह राजे लखोजीराव जाधव यांच्या वंशज परिवाराच्यावतीने जिजाऊंची महापुजा करण्यात  आली. त्यानंतर सिंदखेडराजाचे आ. शशिकांत खेडेकर यांनी प्रथम पुजा केली. यावेळी आतषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. पशुसंवर्धन व दुग्धविकास  राज्यमंत्री ना. अर्जुनराव खोतकर, खासदार प्रतापराव जाधव यांनीही राजवाड्यात जावुन जिजाऊ व बाल शिवबाच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी  नगराध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, राजेंद्र अोंरे, अतिश तायडे, संदिप मेहेत्रे, सतिश काळे, शिवा ठाकरे, डॉ. सविता बुरुकूल, सिमाताई शेवाळे आदींनी माँ जिजाऊंना  पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले. तसेच वारकरी सांप्रदायाच्या वतीने सुध्दा माँ जिजाऊचे पुजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद बुलडाणा व  पंचायत समिती सिंदखेडराजा यांच्या वतीने जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ, शिक्षणाधिकारी एन.के. देशमुख, उपमुकाअ संतोष लोखंडे, माध्य शिक्षण  अधिकारी सोनवणे, बीडीओ लिखार, उप.मुकाअ. राजपुत, मंडळ अधिकारी शिल्पाताई पवार, गटविस्तार अधिकारी महेश सुळे, गटशिक्षणाधिकारी दिपक  सवडतकर यांच्यासह मुसदवाले, तसेच केंद्र प्रमुख जि.प.व.प.स. कर्मचार्‍यांनी सुध्दा जिजाऊंच्या चरणी पुष्पहार अर्पण करुन पुजन केले. पुजनानंतर नगर  पालिकेत पाहुण्यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.
त्यानंतर सायंकाळी जिजाऊ सृष्टी शिवधर्मपिठावर मुख्य कार्यक्रम सायंकाळी पार पडला. यावेळी विचारपीठावर कोल्हापूर संस्थानचे छत्रपती युवराज  संभाजी राजे भोसले, माजी आमदार रेखाताई खेडेकर, प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा  छायाताई महाले, चंद्रशेखर शिखरे, यांच्यासह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. मराठयांनी स्वत:चे प्रश्‍न सोडविण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून  पुढे यावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर केले. आगामी जि.प. व महानगर पालिकेच्या निवडणुूकीत उतरा, असे सांगुन सकल  मराठा समाजाच्या उत्थानासाठी युवकांनी पुढे येण्याचे आवाहनसुध्दा यावेळी त्यांनी केले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राष्ट्रमाता जिजाऊ यांचा 419 वा जन्मोत्सव  आज मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत उत्साहात साजरा करण्यात आला. 20 वर्षानंतर जयंती तिथी आणि तारीख एकाच दिवशी आल्याचा योगसुध्दा आज जुळून  आला होता.
खासदारकीसाठी आपण कोणाच्या दारात गेलो नाही. शिवरायांच्या विचारांचा वारसदार म्हणून हा सन्मान मिळाला. मराठा व बहुजनांचा आवाज बुलंद  करण्यासाठी पुरुषोत्तम खेडेकर यांच्या प्रेरणेने यासन्मानाचा स्वीकार केला. समाजासाठीच आपल काम सुरु राहिल. खासदार म्हणुन नाही तर या मातीच ऋण  आपणा सर्वांवर असल्याने सिंदखेडराजाच्या विकासासाठी योगदान देण्याची ग्वाहीसुध्दा यावेळी खा. संभाजी राजे यांनी दिली. कार्यक्राचे संचालन डॉ. शिवानंद  भानुसे तर आभार सुभाष कोल्हे यांनी मांनले.