नेताजी सुभाषचंद्र बोस अतिक्रमणच्या विळाख्यात
बुलडाणा, दि. 02 - विदर्भचे प्रवेशव्दार असलेल्या मलकापुर शहर येथे तहसिल चौकामध्ये देशगौरव नेताजी सुभाष चंद्र बोस अतिक्रमणच्या विळाख्यात अटकलेले आहे या बाबत सविस्तर असे की, तुम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी दुंगा चे रणशिंग पुकारून मातृभुमीला स्वातंत्र्य करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस आज मलकापुर शहरामध्ये अतिक्रमण व एमससीएी च्या खंब्यामुळे अडथळा निर्माण होत आहे अशा महा थोर पुरूषाची एका प्रकारे विटंबणा होत आहे. हे आझाद हिंद संघटना अजिबात खपवुन घेणार नाही. तरीही नगर परिषद व म.एस.सी.बी.कंपनी व संबंधीत अधिकार्याने येत्या 7 दिसांच्या आत हे अतिक्रमण मोकळे करण्यात यावे अन्यथा आझाद हिंद संघटनेच्या मार्फत रूद्र रूपाचे आंदोलन करण्यात येईल याची गंभीयाने नोंद घेण्यात यावी असा ईशारा विदर्भ संघटक अजय टप व जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्ण भगत, जिल्हा युवा अध्यक्ष राहुल गोसावी, शहर अध्यक्ष शालीग्राम पाटील, शहर युवा अध्यक्ष शे.इमरान, बळीराम बावस्कर, प्रमोद भिसे, राहुल तायडे, संजय अग्रवाल, दिनेश पाटील, अनिल पाटील, राहुल करांडे, संतोष वाघमारे, अजय पवार, यांनी प्रसिध्द पत्रकाव्दारे दिला.