पत्रकारांचे ‘घंटानांद’ आंदोलन
बुलडाणा, दि. 02 - दे.माळी येथील पत्रकार यांच्या वर स्थानिक ग्रामपंचायतचे उपसरपंच विनोद फलके यांनी ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून शुल्लक कारणावरुन वकेलेल्या बेदम मारहाणीचा निषेध करुन उपसरपंच विनोद फलके यांना तत्काळ अटक करुन कठोर कारवाईच्या मागणीाठी व राजकिय सुड भावनेने पत्रकार कैलास राऊत यांचेवर मेहकर पोस्टेला ग्रा.पं.च्या कर्मचार्यांकडून खोटा रिपोर्ट देवून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे आरोप करीत गुन्हा दाखल केला हा गुन्हा खारिज करावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 6 जानेवारी रोजी बुलडाणा येथे जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने घंटानांद आंदोलन करण्याचा इशारा मेहकर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आज ठाणेदार मेहकर पोस्टे मोतीचंद राठोड यांना देण्यात आला.
लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणून वृत्तपत्राकडे बघीतल्या जाते व पत्रकार हा त्यातील महत्वाचा कणा आहे पण हल्ली पत्रकारांवर संपुर्ण देशातच मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरु आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या कुटूंबाकडे सुध्दा वाकड्या नजरेने बघण्याचे धाडस काही राजकिय मंडळी माफीया तसेच धनाढय करीत आहे. आणि पत्रकार सुध्दा याच नेते मंडळी कडे पत्रकार संरक्षण कायद्याची भिक मागतो आहे. गावातील पुढारी ते दिल्लीच्या पुढार्यापासुन पत्रकारांची गळचेपी होत आहे. अगदी लहान गावात सुध्दा वार्ताहर सुरक्षीत नाही. या साठी आता पुढार्याकडे संरक्षणाची भिक न मागता आपल्या लेखण्यांना धार लावत येणार्या 6 जानेवारी रोजी सर्व पत्रकार या गोष्टीचा धिक्कार करतील.
निवेदन देतेवेळी प्रमोदबापू देशमुख, अध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ, गजानन चनेवार तालुका अध्यक्ष ग्रा.पत्रकार संघ, रमेश चव्हाण मेहकर ता.पत्रकार संघ, पुरुषोत्तम लोखंडे, सैय्यद मेहबुब, रविंद्र वाघ, अमर राऊत, फिरोज शाह, विनोद ताहरे, निलेश नाहटा, दत्ता उमाळे, विष्णु आखरे, लक्ष्मण शिवणकर, गजानन दुतोंडे, नवलचंद राठोड, विवेक देशमुख, सुनिल मोरे, मुन्ना काळे, संजय चव्हाण, समाधान बोडखे व तालुक्यातील बरिची पत्रकार मंडळी उपस्थित होती.