राष्ट्रीय शालेय टेनिक्वाईट स्पर्धेसाठी कु.मुक्ता डोसेची निवड
बुलडाणा, दि. 02 - स्थानिक राष्ट्रमाता इंदिरा गांधी न.प.विद्यालयाची विद्यार्थीनी कु.मुक्ता बाबुराव डोसे वर्ग 12 वी या खेळाडुची निवड तामिळनाडु येथील तिरूचरापल्ली या ठिकाणी होणार्या राष्ट्रीय टेनिक्वाईट स्पर्धेसाठी झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शालेय राज्यस्तर स्पर्धा ह्या नंदुरबार येथे दि. 20 ते 22 डिसेंबर 2016 रोजी पार पडल्या ह्या स्पर्धेत 19 वर्ष वयोगटात रा.मा.इं.गां.न.प कनिष्ठ महाविद्यालयाची खेळाडु मुक्ता डोसे या खेळाडुने प्रदर्शन करत पहिल्या पाच खेळाडुमध्ये आपले स्थान निश्चित केले. खेळाडुच्या या यशाबाबत विद्यालयाचे प्राचार्य ए.सी.इंगळे सर यांनी खेळाडुचे आणि प्रशिक्षक एस.जे.राठोड सर आणि पी.एन.कोल्हे सर यांचे अभिनंदन केले. तसेच दि. 3 जानेवारी ते 8 जानेवारी 2017 तामिळनाडु येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळणारी आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारी ही दुसरी खेळाडु आहे.