Breaking News

स्त्री शिक्षणाच्या हक्कासाठी सावित्रीमाई जीवनभर झटल्या ः अ‍ॅड.आगरकर

अहमदनगर, दि. 04 - आज भारतातील स्त्रीया दैनंदिन जीवनात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे व यशही प्राप्त करत आहे, पण या  स्त्रियांना ज्यांनी शिक्षणाचा हक्क मिळवून दिला व त्यांना पुढे नेण्यासाठी संपूर्ण जीवनभर झटत राहिल्या अशा ज्ञानवर्धिनी सावित्रीमाई फुले यांचे विचार सर्व  समाजात निर्माण करावे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. अभय आगरकर यांनी केले.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले चौकातील राऊ युवा प्रतिष्ठानच्यावतीने माजी नगराध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांच्या हस्ते प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी  प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड.राहुल रासकर, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, ज्ञानदेव  रासकर, सुरेश आंबेकर, गजानन ससाणे, नारायण इवळे, संजय कानडे, प्रकाश इवळे, बाबासाहेब गाडळकर, अजय औसरकर,संदिप ढाकणे,जालिंदर  बोरुडे,सचिन रासकर,नितीन गाडळकर, बंटी ससाणे, दत्ता गाडळकर आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले, सावित्रीमाईंनी  अस्पृश्यांच्या मुलांसाठी प्रथम शाळा काढली तसेच प्रौढांसाठीही शाळा काढली. त्या शैक्षणिक प्रचार आणि प्रसार करत, त्यांच्या या कार्यामुळे अनेकांनी त्यांना  त्रास दिला. अंगावर शेण, दगड झेलून त्यांनी शैक्षणिक कार्य सोडले नाही. अशा या महान व्यक्तीचे नाव सारसनगरला देण्यात यावे, असे आवाहनही श्री बोराटे  यांनी केले.