Breaking News

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वेबसाईटचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

अहमदनगर, दि. 04 - शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पक्षाची माहिती व त्याबरोबरच नगर जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांची, विविध क्षेत्रात कारकीर्द  घडविलेल्या महिलांची माहिती, पोलिसांची हेल्पलाईन, विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक माहिती, शाळा, महाविद्यालयांची, तसेच हॉस्पिटल, दवाखाने यांची माहिती या  वेबसाईटद्वारे मिळणार आहे. डब्ल्यूडब्ल्यूडबल्यू.एनसीपीनगरसिटीमहिला.ओआरजी अशी ही वेबसाईट आहे, असे शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा चव्हाण-आठरे यांनी  सांगितले.
या वेबसाईटचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते संगणकाची कळ दाबून संपन्न झाले. यावेळी खा. पवार यांना  वेबसाईटविषयी शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा चव्हाण-आठरे यांनी माहिती दिली. यावेळी दिलीप वळसे पा., अंकुश काकडे, आ. संग्राम जगताप, लता गायकवाड,  सुरेखा कडुस, मनीषा आठरे, कटारिया, लता खरात, संगीता कुलट, शशिकला झरेकर आदी उपस्थित होते.