राज्यस्तरीय बुद्धिबळ प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ
। नगर बरोबरच राज्यातही ग्रॅण्डमास्टर खेळाडू निर्माण करण्याचे स्वप्न
अहमदनगर, दि. 02 - अ.नगर जिल्हा बुद्धिबळ संघटना व शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन आयोजित राज्यस्तरीय बुद्धिबळ प्रशिक्षण शुभारंभ लॅदीमिरो कझाकिस्तान (रशियन) ग्रॅण्डमास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल आयरिश मध्ये संपन्न झाला. यावेळी अ.नगर बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्री.नरेंद्र फिरोदिया,ग्रॅण्डमास्टर शार्दुल गागरे, शामली गागरे सचिव यशवंत बापट, खजिनदार श्री.सुबोध ठोंबरे, विश्वस्त श्री.पारुनाथ ठोकळे, डॉ.अण्णासाहेब गागरे, शाम कांबळे, दिलीप चौधरी, प्रकाश गुजराथी, संजय खडके, नवनीत कोठारी, आणेकर वाखारे, खेळाडू, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, येत्या नववर्षात असो.तर्फे स्पर्धा बरोबरच बुद्धिबळ प्रशिक्षणाला प्राधान्य देऊन नगर बरोबरच राज्यातही ग्रॅण्डमास्टर खेळाडू निर्माण करण्याचे स्वप्न आहे. महाराष्ट्रात अ.नगर हे बुद्धिबळासाठी महत्वाचे केंद्र बनले असून ग्रामीण भागातील उत्तम खेळाडूंना या प्रशिक्षणाचा लाभ होईल. या प्रशिक्षणातून शार्दुल सारखा खेळाडू सुपर ग्रॅण्डमास्टर निश्चितच बनेल. सर्व प्रशिक्षणार्थींनी मनापासून या तीन दिवसीय प्रशिक्षणाचा फायदा घेऊन स्वतःला विकसित करावे. प्रशिक्षक लॅदिमिरो यांनी बुद्धिबळासाठी कार्यरत असो.व फिरोदिया फौंडेशनचे कौतुक केले. खेळाडू घडविण्यासाठी त्यांना चांगले व्यासपिठ व मार्गदर्शन आवश्यक असते. यातून त्यांना नवी दिशा निश्चित मिळेल असे सांगितले.ग्रॅण्डमास्टर शार्दुल गागरे, शामली गागरे, पालक मंदा हांडे, क्रीडाशिक्षक रामचंद्र गोडळकर यांनी मनोगत व्यक्त केले.मान्यवरांच्या हस्ते बुद्धिबळात राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर चमकलेले खेळाडू व प्रिशिक्षक 1) श्रेया आणेकर- स्टेट निवड, 2) अजित होडे- स्टेट निवड, 3) सुयोग वाघ- नॅशनल फर्स्ट, 4) संकर्ण शेळके- स्टेट, 5) सत्यम वरुडे- युनिवर्सिटी नॅशनल, 6) सुनील जोशी- जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालय- प्रशिक्षण, 7) अरुण माळी- धुळे येथे झालेल्या राज्य अजिंक्य स्पर्धेत प्रथम- व केरळ येथे नॅशनल साठी निवड (जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालय), 8) चेतन खेडकर- उत्तेजनार्थ- स्टॅन्ड बाय, 9) रामचंद्र गाडेकर- क्रीडाशिक्षक- जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालय, टिळक रोड, यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालयास बुद्धिबळ खेळाचा संघ भेट देण्यात आला.