देशाच्या विकासात युवकांचे मोठे योगदान ः निकाळजे
अहमदनगर, दि. 02 - थर्टी फर्स्ट... म्हणजे गोल्डन डे झालायं. वर्षरात करत नाहीत तेव्हढी पापे... चुका या दिवशी होतात आपल्याला मनुष्यजन्म मिळालाय, पण हा जन्म-जीवन उत्तम बनवण्याऐवजी आपण कुठल्या दिशेने जातो. 31 डिसेंबर तर जणू गोल्डन डे झालाय. वर्षभरात ज्या मार्गाने आपण जात नाही, त्या मार्गाने मित्रांच्या संगतीने आणि आग्रहाने जातो आणि आपल्या जीवनाचे नुकसान करुन घेतो. देशाच्या विकासात युवकांचे मोठे योगदान असते. यासाठी युवकांनी स्वयंप्रकाशित होऊन, देशकार्याला हातभार लावावा, असे प्रतिपादन पोलिस निरिक्षक आर.डि.निकाळजे यांनी केले.सक्षम युवा प्रतिष्ठानच्यावतीने प्रोफसर कॉलनी चौक येथे नवीन वर्षाचे स्वागत नटराज पूजन करुन करताना पो.नि.आर.डि.निकाळजे. याप्रसंगी एल अॅण्ड टी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अरविंद पारगांवकर, शिल्पकार प्रमोद कांबळे, उद्योजक अनिल जोशी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष क्षितीज झावरे, जालिंदर बोरुडे, अंजली देवकर, अजित माने, संदिप दंडवते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मंगलाराप्, सचिव विराज मुनोत, पवन नाईक आदि उपस्थित होते.यावेळी बोलताना अरविंद पारगांवकर म्हणाले, भारतीय संस्कृती ही जगात महान संस्कृती म्हणून ओळखली जाते. त्यामुळे आपल्या संस्कृतीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. थर्टीफस्टला घांगडधिंगाना घालून समाजात उपद्रव निर्माण करण्यापेक्षा काही विधायक कामे केली तर ती समाजासाठी व येणार्या पिढीसाठी आदर्शवत ठरतील. त्यामुळे युवकांनी अशाच विधायक कामात आपला वेळ घालविला पाहिजे. यावेळी सक्षम युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मंगलाराप् म्हणाले, प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या 10 वर्षापासून 31 डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षाचे स्वागत हे नटराज पूजनाने करण्यात येत असते. त्यामुळे युवकांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची गोडी लागावी, त्याच्या कला-गुणांना वाव मिळवा, हा या मागील उद्देश आहे. सक्षम प्रतिष्ठानच्यावतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येत असतात, असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी सचिव विराज मुनोत म्हणाले, यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान दान, आरोग्य शिबीर, नाट्य प्रशिक्षण व विविध स्पर्धांच्या माध्यमातून मुलांना स्टेज उपलब्ध करुन देण्यात येत असते. यापुढेही असेच उपक्रम सुरु राहतील.