Breaking News

शेतकर्‍यांसाठी राष्ट्रवादी आंदोलन उभारणार : घुले

। शासकीय तूर खरेदी केंद्राचा क्षितील घुलेंचया हस्ते शुभारंभ 

अहमदनगर, दि. 02 - शेवगाव बाजार समितीने कायम शेतकर्यांविषयी न्यायाची भूमिका घेतली आहे. शेतकर्यांवर सरकार बदलल्यापासून अन्याय होत असून,  याविरुध्द राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल,असा इशारा युवानेते क्षितीज घुले यांनी दिला आहे. शेवगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  दि. महाराष्ट्र स्टेट को - ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि., नाफेड व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने खरीप हंगाम 2016-17 आधारभूत किंमत खरेदी  योजनेंतर्गत शासकीय तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ क्षितीज घुले यांच्या हस्ते झाला, या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तहसीलदार दादासाहेब गीते होते. या  वेळी ज्ञानेश्‍वरचे संचालक काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, ताहेर पटेल, बाजार समितीचे उपसभापती विष्णुपंत बोडखे,  नगरसेवक सागर फडके, फेडरेशनचे एन. के.चंद्रे, कृष्णा पायघन, पुरुषोत्तम धूत आदी उपस्थित होते. घुले म्हणाले, नोटा बंदीनंतर शासनाने शेतकर्यांचा काहीच  विचार केलेला नाही. 90 टक्के शेतकर्‍यांकडे क्रेडिट कार्ड नसताना शासन कॅशलेस व्यवहाराच्या गप्पा मारत आहे. कॅशलेस व्यवहाराविषयी सामान्य जनता व  शेतकर्‍यांना तांत्रिक माहिती नसल्यामुळे कॅशलेस ही संकल्पना ग्रामीण भागात रुजविणे अवघड आहे. शेतकर्यांवर होणार्‍यां अन्यायाविरुध्द राष्ट्रवादीचे नेते शरद  पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर माजी आ. नरेद्र घुले व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात 9 जानेवारी रोजी आंदोलन  कर.ण्यात येणार आहे. गीते म्हणाले, तूर खरेदी केंद्र सुरू केल्याने शेतकर्‍यांची गैरसोय दूर होणार आहे. याबाबतचे सर्व व्यवहार चेकव्दारे होणार असून,  शेतकर्र्‍यांच्या खात्यात पैसे त्वरित जमा होणार आहेत. या वेळी तूर विक्रीसाठी आलेले शेतकरी देवराव काळे व नानासाहेब पवार यांचा तहसीलदार यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती रामनाथ राजपुरे यांनी केले. संजय शिंदे यांनी आभार मानले.