युवकांनी समाज कार्यात सहभागी व्हावे ः दत्ता मुदगल
अहमदनगर, दि. 02 - खोटे बोलणारे,फसवणुक करणारे, व्यसन करणारे, भ्रष्टाचार करणारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे देशाच्या विकासाला मोठी खिळ बसली आहे. याला आपणच जबाबदार आहोत. रस्ते, वीज, पाणी उपलब्ध होणे हा फक्त भैतिक विकास आहे, मात्र प्रत्येक मानवाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, यासाठी सांस्कृतिक मुल्य जपणे अत्यंत महत्वाचे आहे. माध्यमांचे आक्रमण होत आहे, टीव्ही, फेसबुक, व्हॉटस्मुळे आपआपसात बोलण्याचे प्रमाण कमी झाले आहे. घरात मालिकांबाबतच चर्चा जास्त होते. त्यामुळे कौटुंबिक पाया खचत चालला आहे. हा पाया मजबुत करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक दत्ता मुदगल यांनी केले.
आर्ट ऑफ लिव्हींगच्यावतीने युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत 31 डिसेंबरच्या रात्री शहरातील विविध चौकात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल, अमर कळमकर, गणेश क्षीरसागर,भैय्या चौधरी,ठकाराम गायके, भाऊ भालेकर, मोहन बुगे, शिवाजी जगताप, योगेश काकडे आदि उपस्थित होते.पुढे बोलताना मुदगल म्हणाले, आजचा युवक हा व्यसनाच्या आहारी जात असल्याचे दिसत आहे. परंतु आर्ट ऑफ लिव्हींगच्या युवकांनी आज जो स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला आहे. तो युवकांना प्रेरणादायी असाच आहे. युवकांनी समाजिक कार्यात सहभाग घेतल्यास मोठे कार्य होऊ शकते. त्यांची असेच कार्य पुढे सुरु ठेवावे, आपण त्यांना नेहमीच सहकार्य करु, असे सांगितले. यावेळी बोलताना प्रोजेक्ट हेड अमर कळमकर म्हणाले, श्री श्री श्री रवी शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्य केले जाते. युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत थर्टीफस्टला डि.जे., गोंधळ घालून व हिडीस नृत्य करुन नवीन वर्ष साजरे करण्यापेक्षा युवकांनी विधायक कामाने नवीन वर्षाचे स्वागत केले पाहिजे. स्वच्छ भारत अभियान हे मोठ्या प्रमाणात देशभर राबविण्यात येत आहे. त्यात आपलाही सहभाग असावा, युवकांनी देश कार्यात सहभागी व्हावे, हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश असून, यात सुमारे शहरातील 100 युवक सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.