रिओ ऑलम्पिक विजेत्या दीपा मलिक यांचा निंबोडी ग्रामस्थांच्यावतीने स्वागत
अहमदनगर, दि. 02 - नगर जिल्ह्याने मला खूप प्रेम दिले, आज त्यांच्या पाठबळामुळेच मी भारताकडून खेळातांना रिओ ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सिल्व्हर मेडल मिळू शकले, याचा मला अभिनान असल्याचे मत दीपा मलिक यांनी व्यक्त केले.
रिओ ऑलिंपिकमध्ये भारताला सिल्व्हर मेडल मिळवून देणार्या दिपा मलिक यांचे नगर तालुक्यातील निंबोडी येथे स्वागत करुन मिरवणुक काढण्यात आली. याप्रसंगी कुसूम पानपाटील, दीक्षा भिंगारदिवे, कमल कानडे, उषा भिंगारदिवे, छाया पाटोळे, रविना भिंगारदिवे, संतोष भिंगारदिवे, सानिया शेख, मनोहर भिंगारदिवे आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना दीपा मलिक म्हणाल्या, रिओ ऑलिंपिकमध्ये अपंगांसाठीच्या ज्या ज्या स्पर्धा झाल्या, त्या स्पर्धांमधून खेळतांना मला महिलांमधून भारताला पदक मिळवून देणारी पहिली महिला ठरल्याचा मला अभिमान आहे. नगर शहराशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अपंगत्व आल्यापासून मी मैदानापासून दूर होते. त्यानंतर अपंगांसाठी असलेल्या क्रिडा स्पर्धांची माहिती मला मिळाली. त्यामध्ये सहभागी झाल्याने मला विविध स्पर्धात यश मिळत गेले. माझे पती विक्रमसिंह माझ्या पाठिशी नेहमी उभे राहत. यावेळी निंबोडी ग्रामस्थांच्यावतीने त्यांच्या गावातून भव्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी जि.प.शाळेतील विद्यार्थी ढोल-ताशांच्या गजरात सहभागी झाले होते. महिलांनी औक्षण करुन त्यांचे स्वागत केले. यावेळी मंगल पानसरे, प्रभाकर पंडित, राजेश मुखेकर, सागर जाधव, करण भोगडे, कर्नल काशिद, विक्रम बेरड, आदीसह निर्मला दातीर, संतोष भिंगारदिवे, सुनिल गवळी आदिंसह शिक्षकवृंद उपस्थित होते.