पाथर्डीत जि.प निवडणुकीसाठी बैठका सुरु
अहमदनगर, दि. 06 - प्रभु रामचंद्रांनी बारा वर्ष वनवास भोगला त्या पेक्षा जास्त पीडा अॅड.प्रताप ढाकणेंना होउन सलग वीस वर्ष वनवासासारखा संघर्ष करावा लागत आहे .पराभव पचत ढाकणे कुटुंब सर्वसामान्यांसाठी धडपडत राहिले . अजुन किती दिवस परिक्षा दयावी लागेल याची कल्पना नसली तरी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी संघर्षाची शक्ती संपलेली नाही जिल्हा परिषदेची निवडणुक लढविण्याबाबत कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा आवश्य विचार करू अशा शब्दात प्रभावती प्रताप ढाकणे यांनी मेळाव्यात संवाद साधून सक्रीय राजकारणात प्रवेशाचे अप्रत्यक्षपणे सुतोवाच केले
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भालगाव जिल्हा परिषद गटातुन सौ. प्रभावती ढाकणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे .आंतरजातीय लग्न केल्यावरही ढाकणे कुटुंबाकडून मिळालेल्या प्रेमाचा त्यांनी भाषणातुन आर्वजुन उल्लेख केला सुमारे वीस वर्ष आदर्श गृहीणी म्हणुन घर सांभाळत प्रपंचाची धुरा यशस्वपिणे वाहीली वीस वर्षात कधीही राजकीय व्यासपीठावर भाषण केले नाही निवडणुक निमीत्ताने ढाकणे कुटुंबातील महिला नव्यानेच पुढे आल्याने राजकीय संघर्ष सुध्दा अधिक गतीने सुरू होणार आहे . राजळे कुटुंबातील मोनिका राजळे पाच वर्षापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात आल्या जिल्हा परिषदेत निवडुण आल्या व जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा झाल्या त्यानंतर राजीनामा देउन विधानसभा निवडणुक जिंकली व आमदार झाल्या . आता प्रभावती ढाकणे यांनी सुद्धा सक्रीय राजकारणात जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन पुढे येत आहेत परिणामकारक प्रभावी भाषणाने अॅड. प्रताप ढाकणे सुध्दा प्रभावीत झाले .
ढाकणे म्हणाल्या गेल्या वीस वर्षापासुन पत्नी या नात्याने प्रताप ढाकणे यांचा संघर्ष पाहिला सर्व पचवुन लोकांसाठी बाहेर पडणारा खंबीर नेता खर्या अर्थाने अहोरात्र सर्वसामान्यासाठी झटत आहे भालगाव -टाकळीमानुर गटाने ढाकणे कुटुंबाला खरी राजकीय शक्ती दिली . पुढार्यांचा आग्रह कुटुंबातील व्यक्तीला पुढे करण्याचा आसतो ढाकणे कुटुंब अशा प्रकाराला सुध्दा अपवाद आहे . यापूर्वी दोन वेळा माझ्या नावाचा आग्रह कार्यकत्यांनी केला पण इतरांना उमेदवारी देउन निवडुण आणले . या वेळेस सुध्दा कार्यकर्ते थांबायला तयार नाहीत लोकभावनेचा विचार यंदा आपण निश्चीत करू बारा वर्ष प्रतापरावांनी भाजपाचे प्रामाणीकपणे काम केले काम करूनही स्वाभीमानाला ठेच लागली म्हणुन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे , सिताराम बोरूडे ,जगदंबा आघाडीचे अध्यक्ष अमोल बडे, जि.प. सदस्या उज्वला शिरसाठ, देविदास खेडकर , अंकुश कासुळे , राजेंद्र दौंड,बाळासाहेब बटुळे, महादेव दराडे , बाळासाहेब दराडे अनिल ढाकणे आदिची भाषणे झाली.