दाते पंचाग दिनदर्शिकेच्या मालकावर गुन्हा दाखल होण्यासाठी
अहमदनगर, दि. 06 - प्रजासत्ताक दिन, बुध्दपौर्णिमा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुडफ्रायडे, गुरुनानक जयंती, ख्रिसमस आदि महामानवांचे जन्मदिवस व ख्रिस्ती समाजाचे सण अशुभ दिवस म्हणून वर्तवणार्या दाते पंचाग दिनदर्शिकेच्या मालकावर गुन्हा दाखल करुन, कारवाई करण्याच्या मागणीसाठी कोठी येथे नगर-पुणे महामार्गावर ख्रिश्चन समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.घटनास्थळी पोलिसांनी धाव घेवून आंदोलन कर्त्यांची समजूत काढून, संबंधीत दिनदर्शिकेच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. रास्ता रोकोने नगर-पुणे महामार्गाची वाहतुक खोळंबली होती. आंदोलकांनी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये जावून दाते पंचाग दिनदर्शिकेच्या मालकावर गुन्हा दाखल केला.