Breaking News

शेतकर्‍यांना कर्ज माफी नव्हे कर्ज मुक्ती द्या ः खा.प्रतापराव जाधव

बुलडाणा, दि. 09 - न.पा.मेहकर मध्ये निवडून आलेल्या शिवसेनेच्या शिलेदार नगरसेवक, नगरसेविका, उपाध्यक्ष व स्विकृत सदस्य यांच्या सत्काराचा व  मतदारांच्या आभारासाठी मेहकर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  आयोजीत सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष आमदार डॉ.संजय रायमुलकर होते. तर  कार्यक्रमाचे प्रेरणास्थान खा.बुलडाणा लोकसभा प्रतापराव जाधव होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत, आ.शशिकांत खेडेकर, माधवराव जाधव,  युवासेना जिल्हाप्रमुख ॠषी जाधव जिल्ह्यातून न.पा.उपाध्यक्ष पदी निवडून आलेले पदाधिकारी मधुमामा रहाटे, सागर पाटील, सभापती पं.स.शिव पाटील  तेजनकर, कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार, न.पा.गटनेते संजय जाधव, उपाध्यक्ष जयचंद बाठीया, नगरसेवक मनोज जाधव, पिंटू अर्जून, तौफीक कुरेशी,  ओम सौभागे, रामेश्‍वर भिसे, नगरसेविका सौ.मिराताई तायडे, सौ.शारदा सास्ते, हलीमाबी गवई, सौ.डॉ.दिपीका रहाटे, सौ.संगिता रिंढे, सौ.ज्योती घोडे, सौ.कमल  लष्कर, स्विकृत सदस्य विकास जोशी, सौ.अल्काताई गायकवाड आदिंची उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तर खा.प्रतापराव जाधव,  आ.डॉ.संजय रायमूलकर, आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या हस्ते नवनिर्वाचीत उपाध्यक्ष, सदस्य, स्विकृत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना खा.प्रतापराव जाधव म्हणाले की, न.पा.निवडणुक तसेच होणार्‍या जि.पं., पं.स.निवडणूकीसाठीपण मतदारांनी शिवसेनेला भरभरून  सहकार्य करावे व येणार्‍या निवडणूकीत भगवा फडकविण्याच्या संकल्प करावा असे आवाहन केले. तर ग्रामीण व शहरी भागातून मोठया प्रमाणात आलेल्या प्रचंड  शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते व मतदारांना, मागील न.प.च्या काँग्रेसच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणावर झालेल्या भ्रष्टाचाराला उघडकीस आणण्याचे काम  शिवसेना करणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.
पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, माजी नगराध्यक्ष आणि परत निवडून आलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षाने धनशक्तीने निवचडणूक जिंकली. जनतेचा पैसा  जमा करुन त्याचा उपयोग निवडणूकीत वापरून नगरपरिषदेचे अध्यक्षपद मिळवीले. पण आता 24 पैकी 14 नगरसेवक, नगरसेविका व 2 स्विकृत सदस्य अशी  भक्कम बाजू नगरपरिषदेमध्ये शिवसेनेची आहे. त्यामळे यापुढे न.पा.मध्ये कोणताही भ्रष्टाचार खपविला जाणार नाही. तर मागील पाच वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराचा  तक्रारी पर्यंत गेल्या असून मतदारांनी परत नगरअध्यक्षपदाच्या पोटनिवडणूकीला सामोरे जावे लागणार यात काही शंका नाही. तसेच येणार्‍या जि.प.व पं.स.  निवडणूकीत सरकारला शेतकर्‍यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती द्या अशी मागणी करणार. कारण शेतकर्‍याने कोणता अपराध केला म्हणजे त्याला ‘माफी’  द्यावी, तर कर्जमुक्ती घ्यावी कारण सतत 3 वर्षापासून शेतकरी दुष्काळ सहन करीत आला. आणि आता 500 व 1000 च्या चलन बंदीमुळे शेतकर्‍याच्या मालाला  भाव मिळत नसून शेतकर्‍याचे पैसे सुध्दा मिळत नाही. त्या मुळे भविष्यात शेतकर्‍यांसाठी वेगवेगळे बजट तयार करावे असे सरकार दरबारी मांडणार असल्याचे  त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयचंद बाठीया यांनी केले. कार्यक्रमाचे शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला. आभार मनोज जाधव यांनी मानले.