पंतप्रधानांच्या परिवर्तन रॅलीसाठी लखनौ सज्ज !
लखनौ, दि. 02 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लखनौमध्ये परिवर्तन रॅलीला संबोधित करणार आहेत. यासाठी सर्व प्रकारची तयारी झाली असून पंतप्रधानांच्या स्वागतासाठी लखनौ शहर सज्ज झाले आहे. जुन्या नोटा बदली करुन घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर प्रथमच पंतप्रधान जाहीर सभेत बोलणार आहेत.
या रॅलीमध्ये 10 लाखांपेक्षा अधिक नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. तसेच रॅलीच्या ठिकाणी नागरिकांना पोहोचता यावे यासाठी 14 हजार बस आणि 50 हजार गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.