नववर्षातही विजयी लय कायम राखू : चेतेश्वर पुजारा
नवी दिल्ली, दि. 02 - नवीन वर्षातदेखील भारतीय संघाची विजयी लय कायम राखण्याचा आम्ही प्रयत्न करू, असा विश्वास फलंदाज चेतेश्वर पुजारा याने व्यक्त केला.
‘2016 हे वर्ष भारतीय संघासाठी उत्तम आणि फलदायी ठरले. आम्ही ज्या योजना आखल्या, त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. हीच लय आता नवीन वर्षातही कायम राखण्याचा आमचा प्रयत्न असेल. खेळाडू म्हणून माझेही मनोधैर्य वाढलेले आहे आणि मीदेखील आणखी चांगली कामगिरी करेन, असा विश्वास पुजाराने व्यक्त केला.