Breaking News

संत चोखामेळा यांच्या जन्मस्थळाला जिल्ह्याचे भूषण असल्याचे अभिमान बाळगा ः प्रा. खिल्लार

आचार सहिंतेच्या नावाखाली अधिकार्‍यांची कार्यक्रमात मनमानी

बुलडाणा, दि. 16 - महाराष्ट्र ही संताची भुमि असून याच जन्मभूमित 12 व्या शतकात विठुरायांचे भक्त संतचोखामेळा यांचा जन्म 14 जानेवारी 1268 ला  मेहुणाराजा गावी झाला.त्यांचे जन्मगांव मेहुणाराजा हे होते. त्याला मोठमोठे विद्वान संतांनी सहमती दर्शवली आहे.त्या महान संताचे जन्मस्थळ जरी उपेक्षित  आहे.तरी या भागातील प्रत्येक माणसाने त्यांना जाती-पातीच्या बंधनात न ठेवता जातीच्या भिंती तोडून बुलढाणा जिल्ह्याचे एक भूषण म्हणून अभिमान बाळगा  असे विचार संतचोखासागर  नामप्रवर्तक प्रा.कमलेश खिल्लारे  व्यक्त केले.संतचोखामेळा यांच्या 749 व्या जयंती निमित्ताने बुलढाणा जिल्हा परिषदच्या मुख्य  कार्यकारी दिपा मुधोळ यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली.यावेळी सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर,माजी जि.प.सदस्य  बाबुराव नागरे,डॉ.उषाताई खेडेकर,सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता डी.टी.शिंपणे, गटविकास अधिकारी पवार,गटशिक्षण अधिकारी दादाराव मसूदवाले, शिवसेना  तालुका प्रमुख दादाराव खार्दे, दिपक बोरकर,प्रा.दिलीप झोटे,भाई दिलीप खरात,विनोद ठाकरे,यांच्यासह अन्यमंडळी उपस्थित होती. यावेळी बोलतांना प्रा.खिल्लारे  म्हणाले की,संत ज्ञानेश्‍वर,संत नामदेव,संत मुक्ताई यांच्या भागवत सांप्रदायमुळे त्यावेळी चंद्रभागेच्या तिरी आध्यतिमिक लोकशाही सुरु होती.सर्व जातीचे संत या  ठिकाणी एकत्र येऊन किर्तन एकत,परंतु मंदिरात जाण्यासाठी जातीची आवश्यकता होती.त्यामुळे संतचोखामेळा यांना दलीत असल्यामुळे जन्मभर विठ्ठलमंदिरात  जाता आले नाही.दर्शन करता आले नाही ते उपेक्षितच राहिले आजही त्यांचे जन्मस्थळ सातशे आठशे वर्षे झाले तरी विकासापासून उपेक्षित असल्याचे खंत वाटत  असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 12 जानेवारी माँ जिजाऊ जन्मोउत्सव व 14 जानेवारी संतचोखाबांचे जन्मस्थळ दोन्ही स्थळ एकाच जिल्ह्यात आणि  दोन्हीमध्ये अंतर फक्त 20ते 25 की.मि.आहेत.त्याठिकाणी हजारोची गर्दी पहावयास मिळते.आणि या जन्मस्थळी शेकडो ही दिसत नाही.ही दुर्दैवाची बाब असल्याचे  प्रा.खिल्लारे यांनी सांगितले.तर यावेळी विनोद ठाकरे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,जात-पात धर्मपंथ राजकारण याकडे दुर्लक्ष करुण पुढच्यावर्षी  पासून सर्वांनी एकत्र येऊन तीन दिवसाचा संतचोखामेळा जन्मोउत्सव साजरा करण्यात यावा तसेच विकासकामासाठी सहकार्याची भावना असावी असे आवाहान  याप्रसंगी केले.संतचोखामेळा यांच्या पालखीची सकाळी गावातुन टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली या पालखीचे गावामध्ये महिलांनी ठीकठिकाणी   पूजन करुण दर्शन घेतले.