Breaking News

जिजाऊ जयंती दिनी जन्मलेल्या मुलींना छत्रपती प्रतिष्ठाद्वारा बेबी किटचे वाटप

 बुलडाणा, दि. 16 - राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून 12 जानेवारी रोजी येथील सामान्य रुग्णालयात जन्मलेल्या बालिकांना छत्रपती  प्रतिष्ठानच्या वतीने बेबी किटचे वाटप करण्यात आले. 
मागील काही वर्षांपासून छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात. यंदा राजमाता जिजाऊ यांची जयंतीची तिथी  तारीख एकाच दिवशी आल्याचा योगायोग साधून शिव प्रतिष्ठानच्या वतीने येथील सामान्य रुग्णालयात जन्माला आलेल्या 20 बालकांना बेबी किटचे वाटप करून  समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या वेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक हिवाळे, छत्रपती प्रतिष्ठानचे श्रीकांत गायकवाड, अनुप  श्रीवास्तव, सचिन शेळके, उत्कर्ष डाफणे, अजय मुठ्ठे, तुषार काटेकर, अमोल देशमुख, गजानन साखरे, अनिल गावंडे, अजिंक्य देशमुख, प्रमोद देशमुख, गोलू  उबरहंडे, अश्‍विन बेदरकर, अजय वाघमारे, राहुल घाडगे, श्रीराम देशमुख, अक्षय तुपकर यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते.