Breaking News

युवा पिढीला थोर पुरुषांचा आदर्श विचारांची गरज : अलोक पवार

अहमदनगर, दि. 16 - राष्ट्रीय युवक दिन सर्वत्र साजरा केला जातो, स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा आदर्श विचारांची युवा पिढीला गरज आहे.  युवकांनी जास्तीत जास्त सामाजिक कार्य करुन आपला देश सक्षम व बलशाली घडवावा, असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे दक्षिण लोकसभा अध्यक्ष अलोक पवार  यांनी केले.
रिमांड होम येथे राष्ट्रीय युवक दिन, राजमाता जिजाऊ जयंती, सावित्रीबाई फुले जयंती व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विश्‍वजित कदम आणि महाराष्ट्र प्रदेश महिला  अध्यक्ष चारुलताताई टोकस यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण लोकसभा युवक काँग्रेसच्यावतीने येथील अनाथ बालकांना 100 किलो अन्नधान्य वाटप करण्यात  आले. याप्रसंगी दक्षिण लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अलोक पवार, सरचिटणीस मंगल भुजबळ, संध्या मेढे, जीवनलता पोखरणा, डॉ.कांचन मोहिते,  मुख्याध्यापक बाळासाहेब म्हस्के, पूजा चव्हाण, दुर्गा सादूल, सौ.पोर्णिमा माने, सुलोचना काळापहाड, सौ.रेखा जाधव, सौ.प्राजक्ता जोशी, शमा शेख, सौ.संजना  रोहोकले, माधुरी भागवत, रेखा वर्मा आदि उपस्थित होते.यावेळी बोलतान सरचिटणीस मंगल भुजबळ म्हणाल्या, थोर पुरुषांचे विचार आचारणात आणून आजची  युवा पिढी घडत आहे. आजचा युवक हा देशाचे भवितव्य असून, तो देशाचा सुजान नागरिक घडणार आहे. राजमाता जिजाऊंमुळे शिवाजी महाराजांसारखा पोलादी  पुरुष महाराष्ट्राला मिळाला, हे आपले भाग्यच म्हणावे लागेल. समाजातील प्रत्येक स्त्री ही जिजाऊ व सावित्री, अहिल्यादेवी आहे. त्यामुळे समाजामध्ये महिलांना  मान-सन्मान देऊन तिचा आदर करायला पाहिजे. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत जीवनात अडीअडचणींना डगमगु नका, स्थीर राह तेही तुमच्या परिपक्वतेची  पातळी वाढविण्यासाठी परिक्षा असते.  अडीअडचणींना हसत सामोरे जा. युवकांना अन्यायाविरद्ध चिड असली पाहिजे, असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  जीवनलता पोखरणा यांनी केले तर आभार मुख्याध्यापक बाळासाहेब म्हस्के यांनी मानले.