Breaking News

एटीएममधून दरदिवशी पैसे काढण्याची मर्यादा 24 हजारांवर

नवी दिल्ली, दि. 30 -एटीएममधून प्रत्येक दिवशी काढता येणार्‍या रकमेची मर्यादा वाढवण्यात आली आहे. एटीएममधून एका दिवशी एका वेळी 24 हजार रुपये काढता येणार आहेत. एक फेब्रुवारीपासून नवा निर्णय लागू होणार आहे.
एटीएममधून प्रत्येक दिवशी 24 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. आठवड्याला मात्र एटीएममधून 24 हजार रुपयेच काढता येणार आहेत. विशेष म्हणजे व्यापार्‍यांना दिलासा देत आरबीआयने चालू खात्यावरील सर्व निर्बंध मागे घेतल्याची घोषणा केली आहे. एक फेब्रुवारीपासून ही मर्यादा लागू होणार आहे. दररोज एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा आतापर्यंत 10 हजार रुपये इतकी होती. दर आठवड्याला सेव्हिंग्ज अकाऊण्टमधून जास्तीत जास्त 24 हजार रुपयेच काढता येणार होते (ही मर्यादा अद्यापही कायम आहे) तर करंट (चालू) अकाऊण्टमधून एक लाख रुपयेच काढता येत होते.