प्रकाश माळोदे यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप
बुलडाणा, दि. 02 - जिल्हा माहिती कार्यालयातील दूरमुद्रक चालक श्री. प्रकाश माळोदे यांना सेवानिवृत्तीनिमित्त आज निरोप देण्यात आला. यावेळी त्यांचा सपतक्ीक शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माहिती सहायक निलेश तायडे म्हणाले, माहिती व जनसंपर्क विभागात प्रकाश माळोदे यांनी 38 वर्ष सेवा दिली आहे. त्यांची सेवा ही कार्यालयासाठी अत्यंत मोलाची राहीली आहे. सेवानिवृत्ती ही कुठल्याही शासकीय कर्मचार्याच्या आयुष्यात येते. मात्र त्यानंतरचे आयुष्य हे त्याच्यासाठी रटाळ जात असल्याचे समाजातील अनुभव आहे. मात्र श्री. माळोदे यांच्या सर्वांशी मिळून मिसळून वागणार्या स्वभावामुळे त्यांना असे आयुष्य जाणार नाही.
यावेळी कर्मचारी कल्याणी दाभाडकर, अनिल कुरकुटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे प्रकाश माळोदे यांनी भावपूर्ण होत आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, माझी सेवा ही सर्वांच्या सहकार्यामुळेच शक्य झाली आहे. सर्वांनी दिलेले सहकार्य हे मी कधीही विसरू शकणार नाही.
प्रकाश माळोदे यांनी 38 वर्ष प्रकाश माळोदे माहिती व जनसंपर्क विभागात विविध पदांवर कार्य केले आहे. त्यांनी बुलडाणा जिल्हा माहिती कार्यालयातील सलग 22 वर्ष सेवा दिली आहे. कार्यक्रमाला श्रीमती कल्याणी दाभाडकर, रमेश सापटे, राम पाटील, विलास जाधव, नितीन बारी, दिलीप टेकाडे, श्रीमती रजनी माळोदे, महसूल विभागातील कर्मचारी सुधाकर खडसे आदी उपस्थित होते.