दया करूणा प्रेमभाव माणुसकीची लक्षण
। जामखेडमध्ये राष्ट्रीय एकात्मता संमेलन संपन्न
जामखेड, दि. 03 - समस्त मानवांची जात एकच असून एकाच आई वडीलांची लेकरं आहेत एकमेकांसाठी र्हदयामध्ये करूणा दया प्रेमभाव तसेच एकमेकांना माफ करण्याची वृत्ती हिच माणुसकीची लक्षण असुन माणुसकी हाच धर्म आहे असे मौलाना मूफ्ती रिजवानूल हसन यांनी मानवतेचा संदेश व राष्ट्रीय एकात्मता संमेलनात उपदेशपर व्याख्यानात सांगितलेमहाराष्ट्र मुस्लिम विकास परिषद जमीअ उलमा हूफ्फाज यांच्यावतीने जि प शासकीय विश्रामगृह खर्डा चौक येथे मानवतेचा संदेश व राष्ट्रीय एकात्मता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे होते मौलाना मूफ्ती रिजवानूल हसन ह भ प गाडेकर महाराज मौलाना जमाल आरिफ नदवी बौध्दाचार्य गोकुळ गायकवाड या प्रमुख वक्त्यांनी जनसमुदायाला मानवतेचा संदेश या विषयावर मार्गदर्शन केले
यावेळी जलसंधारण मंत्री व जिल्हाचे पालक मंत्री प्रा राम शिंदे यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढुन या कार्यक्रमाला धावती भेट दिली त्यांच्याबरोबर सभापती भगवान मुरूमकर भाजपा उपजिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे प स सदस्य मनोज राजगुरू यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे शिवसेना नेते मधुकर राळेभात महाराष्ट्र केसरी बबन काशीद नगरसेवक दिगांबर चव्हाण बिभीषण धनवडे सुरेश कुलथे प्रदीप पाटील मुजफ्फर आत्तार वसीम सय्यद सदाफुले भाऊसाहेब मोहसीन खान आदिची होती.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मौलाना खलील अहमद कासमी मौलाना मूफ्ती अफजल कासमी महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषदेचे कार्याध्यक्ष शेरखान पठाण तालुकाध्यक्ष ताहेरखान उपाध्यक्ष हानिफ कुरेशी जावीद कुरेशी शहराध्यक्ष नईम शेख यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाला शहरासह तालुक्यातील सर्व धर्मिय नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रिजवान बागवान व प्रा जाकीर सर तर आभार मौलाना खलील अहमद यांनी मानले.