वैद्यकिय क्षेत्रात डॉ.निसार शेख एक दीपस्तंभ ः रफिक मुन्शी
अहमदनगर, दि. 03 - वैद्यकिय क्षेत्रात डॉ.निसार शेख एक दीपस्तंभ आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निवडणुकीत विजय मिळवण्याचा मान पहिल्यांदा नगर जिल्ह्याला त्यांच्या माध्यमातून मिळाला असल्याचे प्रतिपादन माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी यांनी करुन, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची माहिती दिली.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निवडणुकीत विजय संपादन केल्याबद्दल डॉ.निसार शेख यांचा मित्र परिवाराच्या वतीने रहेमत सुलतान सभागृहात जाहिर सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणात मुन्शी बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून न्युरोसर्जन डॉ.मोहंमद माजिद, उद्योगपती करिमशेठ हुंडेकरी, माजी उपमहापौर हाजी नजीर शेख, नगरसेवक फैय्याज शेख केबलवाला, इंजी. इकबाल शेख, डॉ.शहेनाज अय्युब, डॉ.एस.एम. इकबाल, डॉ.इकराम काटेवाला, डॉ.रिजवान शेख, आर्किटेक अर्शद शेख, डॉ.माजिद, उबेद शेख, खलील सय्यद, शफी जहागीरदार, वहाब सय्यद आदिसह डॉक्टर व मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविकात डॉ.इकबाल शेख यांनी नगरच्या वैद्यकिय क्षेत्रात डॉ.निसार शेख यांच्या योगदानाची माहिती दिली. सत्काराला उत्तर देताना डॉ.निसार शेख म्हणाले की, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निवडणुकित पहिल्यांदा जिल्ह्यातील डॉक्टरला विजयाचा मान मिळाला आहे. हा विजय माझा नसून संपुर्ण नगर जिल्ह्यातील डॉक्टरांचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी उबेद शेख, आर्किटेक अर्शद शेख, हाजी नजीर शेख यांनी मनोगत व्यक्त केले. युनानी महाविद्यालय काही अंतर्गत कारणाने नगरला झाले नसल्याची खंत उद्योजक करिमशेठ हुंडेकरी यांनी व्यक्त करुन, मुस्लिम समाजाच्या वतीने वैद्यकिय महाविद्यालय नगरमध्ये सुरु करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ.सईद शेख, डॉ.रिजवान शेख, डॉ.इम्रान शेख, डॉ.ईकबाल शेख यांनी केले होते.