धार्मिक व सामाजिक कार्यासाठी दिनदर्शिका उपयुक्त ः संगमनाथ महाराज
अहमदनगर, दि. 03 - दिनदर्शिकेमुळे आपली संस्कृती आणि सण उत्सव कधी, कोणत्या तारखेला आहेत याची माहिती सर्वाना मिळत असल्याने त्यातून धार्मिक कार्य आणि सामाजिक कार्यासाठी दिशादर्शक ठरत असते. दिवसाची सुरुवात ही कॅलेंडर पाहूनच होत असते. त्यामुळे आज दिवस कसा आहे, आणि पुढील दिवसातील घटनांचे अकलन होत असल्याने त्याप्रमाणे नियोजन करणे सोपे जात असते. त्यामुळे श्री संत सावता महाराज उत्सव समितीच्यावतीने काढण्यात आलेली ही दिनदर्शिका सर्वांसाठी उपयुक्त अशीच आहे, असे प्रतिपादन श्री विशाल गणेश देवस्थानचे पुजारी संगमनाथ महाराज यांनी केले.
श्री संत सावता महाराज उत्सव समितीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन श्री.विशाल गणेश मंदिरचे पुजारी संगमनाथ महाराज व गंगानाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर, उत्सव समितीचे प्रमुख छबूनाना जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, शहर बँकेचे चेअरमन अशोक कानडे, अशोकराव कापरे, भाऊसाहेब पुंड, मर्चंट बँकेचे व्हा.चेअरमन विजय कोथिंबीरे, जालिंदर बोरुडे, माधवराव भुतारे, दत्ता जाधव, चंद्रकांत ताठे, सुरेश खरपुडे, डॉ.सुदर्शन गोरे, गजानन ससाणे, संतोष मेहेत्रे, कैलास मोकाटे, प्रकाश शिंदे, रामदास कानडे, पांडूरंग गाडळकर, हर्षल म्हस्के आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना संगमनाथ महाराज म्हणाले, नगर जिल्हा हा संतांची भूमी आहे. या भुमीत अनेक संत होऊ गेले आहेत. संत सावता महाराजांनी समाज उन्नत्तीसाठी मोठे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याला अभिप्रेत असलेले कार्य उत्सव समितीच्यावतीने होत आहे. त्यांनी हे कार्य असेच कायम सुरु ठेवावे, असे इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष छबुनाना जाधव म्हणाले, उत्सव समितीच्यावतीने वर्षभ सामाजिक व धार्मिक कार्य करत असते. श्री.सावता माळी यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते. यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची किर्तने, प्रवचन, हरिपाठ, दिंडी मिरवणुक, अन्नदान असा भव्य सोहळा आयोजित करण्यात येत असतो. तसेच वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांतर्गत रक्तदान, नेत्रतपासणी शिबीर, अन्नदान, दंत आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येत असते. यासाठी अनेकांचा हातभार लागत असतो. यासर्व कार्यक्रमांची माहिती असलेली दिनदर्शिका उत्सव समितीच्यावतीने तयार करण्यात आली आली असून सर्वांना ती मार्गदर्शक ठरेल असे श्री. जाधव यांनी सांगितले. याप्रसंगी अभय आगरकर, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर आदिंनी दिनदर्शिकेमुळे नागरिकांच्या ज्ञानात भर पडणार असून सण-समारंभ, तिथी यांची परिपूर्ण माहिती असल्याने विशेषत: महिलांना याचा चांगला उपयोग होऊ शकतो, असे सांगून चांगले समाजिक उपक्रम राबवित असल्याबद्दल उत्सव समितीचे कौतुक केले.