Breaking News

खुश हाऊसिंग फायनान्सचे अहमदनगरमध्ये कामकाज सुरू

अहमदनगर, दि. 15 - आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना परवडणार्‍या दरात अर्थसहाय्य उपलब्ध करून देणार्‍या खुश हाऊसिंग फायनान्सने(खुश) महाराष्ट्रातील  अहमदनगर येथे कामकाजाला सुरुवात केली आहे. देशातील खुशचे हे दहावे कार्यालय आहे. खुश ही जलदगतीने वृद्धी होणारी एक गृहवित्त कंपनी असून  आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक व शहरी भागातील गरीबांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कंपनीच्या परंपरेप्रमाणे शहरातील कंपनीच्या  पहिल्या ग्राहकाने शाखेचे उद्घाटन केले. 
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक श्री. अमित मागिया यावेळी म्हणाले, वृद्धीची गती कायम ठेवता आल्याबद्दल आम्ही अभिमानी  आहोत. अहमदनगर हे महत्त्वाचे शहर आहे व पहिल्यांदाच घर घेणार्‍यांची संख्या मोठी आहे. खुशमध्ये आम्ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत व यासह  आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सर्वांसाठी घर’ हे लक्ष्य पूर्ण करण्यात मदत करत आहोत. परवडणार्‍या दरात गृहकर्ज उपलब्ध करून देऊन, लोकांच्या  गरजेप्रमाणे आणि सोयीनुसार सुविधा देऊन देशाच्या शहरीभागात राहणार्‍या लाखो लोकांना त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही मदत करत आहोत.  खुशला अहमदनगरमध्ये काम सुरू केल्याचा अभिमान आहे आणि नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील  राहू.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आणि शहरी भागातील गरीबांना परवडणार्‍या दरात घरासाठी कर्ज देण्याचे खुशचे लक्ष आहे. कागदपत्रांची कमतरता, उत्पन्नाचा  पुरावा, रहिवाशी पुरावा यांच्या अभावामुळे सर्वसामान्यपणे या घटकांना पारंपरिक बँकिंग व्यवस्थेकडून दुर्लक्षित केले जाते. मालमत्तेच्या दर्जाशी तडजोड न करता  अपारंपरिक निकषांचा वापर करून घर घेण्यास इच्छुक व्यक्तींची कर्ज फेडण्याची क्षमता तपासून त्यांना कर्ज दिले जाते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत क्रेडीट  लिंक्ड सबसिडी योजनेसाठी कंपनीने नॅशनल हाऊसिंग बँकेसोबत सामंजस्य करारही केला आहे जेणेकरून ग्राहकांना घरे अधिक परवडू शकतील.