Breaking News

राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत अकलुज,पुणे, औरंगाबादचे यश

अहमदनगर, दि 17 - सेवक सामाजीक संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धत  अकलुज ,पुणे वऔरंगाबादला प्रथम तर  द्वीतीय क्रमांक  औरंगाबाद व सांगली येथील स्पर्धकांना विभागुन देण्यात राज्याच्या विविध भागातुन स्पर्धकांचा मोठा प्रतिसाद लाभला नोटाबंदी, दहशतवाद , जातीयवाद , महिला  सबलीकरण या सह एकुण आठ विषय वकृत्व स्पर्धसाठी  ठेवण्यात आले होते.
 स्पर्धचा सविस्तर निकाल असा प्रथम क्रमांक रोहित देशमुख ( अकलूज) निखील नगरकर ( पुणे ) कोमल औताडे( औरंगाबाद ) द्वितीय क्रमांक निकिता पाटील  (औरंगाबाद) आश्‍विनी वडगावे ( सांगली ) तृतीय क्रमांक कोमल गायकवाड( कर्जत) श्‍वेता भांबरे ( नाशिक) विशाल शिरतोडे ( सांगली) तर उत्तेजनार्थ म्हणुन  सुमीत भोसले व चंचल शेळके (अकलुज), जितेंद्र पवार औरंगाबाद , सतिष कांबळे ( मुंबई ) आकाश मोरगे ( श्रीरामपुर) अशोक शिंदे ( पारनेर), निलेश पर्वत (  संगमनेर), ऐश्‍वर्या भिद्रे ( मुंबई ), भरत रिडलॉन ( औरंगाबाद ) सचिन नागापुरे (पाथर्डी) आदित्य वडवणीकर यांना सन्मानपूर्वक पारितोषके मान्यवरांच्या हस्ते  प्रदान करण्यात आली. सेवक करंडक अकलूजच्या  स्पर्धकांना प्रदान करण्यात आला .
 तृतीय पंथीयाच्या हक्कासाठी झगडणार्‍या दिशा केने पोलिस निरिक्षक  पांडुरंग पवार, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके ,नगरसेवक प्रसाद अवहाड , अनिल बोरूडे ,  संतोष गट्टाणी , डॉ. सचिन गांधी , पै. सतीष मासाळकर , पप्पू बोर्डे, विकास गोरे आदींच्या हस्ते पारितोषीके प्रदान करण्यात आली. यावेळी बोलतांना दिशा केने  म्हणाल्या तृतीयपंथीया बद्दल व्यक्त होणारी सहानुभती कृतीतुन उतरावयला हवी माणसाच्या गर्दी आम्हालाही सामावुन घेतले जावे अपेक्षीतांचे जगणे अजुन किती  पिढयांनी सोसायचे याचे उत्तर कुठे सापडत नाही .लैंगिक समानता आगामी काळात सर्वत्र स्थापीत झाली यासाठी आपण चळवळ हाती घेतली आहे . व्याख्याने,  बौध्दीक लेखन , लोकसंपर्कातुन वैचारिक परिवर्तन घडवत आहेत चळवळीत काम करूनही आपण अजुन सुध्दा बाजार मागुन उदरनिर्वाह करतो खर्चात बचत  करून विविध संस्थाना मदत करत कार्य चालु आहे अशा स्पर्धांच्या माध्यमातुन तरूणाईशी संवाद साधत नवसमाज रचना साधायची आहे परिक्षक म्हणुन शिवराज  आनंदकर , अफसर शेख , व उध्दव काळापाहाड यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे प्रास्तावीक मुख्य संयोजक अमोल राठोड सुत्रसंचालन साक्षी प्रथमशेट्टी व अनिल  राठोड तर आभार भिमराज पवार यांनी मानले संदिप राठोड, साधना तावरे , रोहिणी शिरवाळे , प्रभाकर पवार, राजू राठोड आदिनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी   विशेष परिश्रम घेतले.