Breaking News

उमेदवारी मिळविण्यासाठी ‘नेते’ ‘कार्यकर्ते’ सज्ज!

बुलडाणा, दि 17 - सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकिय पक्षांची उमेदवारी मिळविण्यासाठी विविध माध्यमातून राजकिय  नेते सज्ज झाले आहेत. या निवडणूकीसाठी भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस, भारीप बमसं, शेतकरी संघटना, बहूजन समाज पक्ष, व इतर राजकिय  पक्षांकडून जोमात तयारी केली  जात आहे. इच्छूकांचे अर्ज भरुन घेणे, पक्ष निरीक्षकांची संवाद मेळावे, भुमिपूजन सोहळ्याच्या माध्यमातून राजकिय वातावरण  ढवळून निघाले आहे. राजकिय व सामाजिक गणिते जोडणे सुरु आहेत. काँग्रेसमध्ये मनोरंजन रुसवे फुगवे, दिसून येत आहे. तसेच त्यामध्ये नविन भरही पडत  आहे. 
संग्रामपूर तालुक्यातील संग्रामपूर गट कमी झाल्याने पळशी झाशी नविन गट झाल्यामुळे गणांमध्ये मोठा बदल घडत आहे. तसेच सोनाळा गट सर्वसाधारण  असल्यामुळे सर्व राजकिय पक्षांचे नेते आपली उमेदवारी निश्‍चीत करण्याच्या मार्गावर आहे. बावनबिर गणात व गटात आरक्षणामुळे मागास व महिला प्रवर्ग  असल्यामुळे राजकिय नेते यांची गोची झाली आहे. आपली सुविद्य पत्नीला उमेदवारी देण्याच्या तयारीला इच्छूक लागलेले दिसत आहेत. पातुर्डा गट, पळशी झाशी  गटाला अनुसूचित जाती व जमाती त्यात पळशी झाशी अनूसुचित जमाती चे गटात आरक्षणामुळे राखीव झाल्याने गोची निर्माण झाली आहे. व राजकिय  पदाधिकार्‍यांना डोकेदूखी झाली आहे. सध्या स्वाभिमानी संघटनेला उमेदवार मीळत नाही. निरीक्षकांकडे, तीन अर्ज दाखल झालेत. पातुर्डा, कवदळ, व वानखेड  उमेदवार निश्‍चीत झाल्याचे चर्चेत आहे. बहूजन समाज पक्षात कमालीची शांतता असून ही वादळापूर्वीची शांतता मानल्या जात आहे. या पक्षात कमी बंडखोरी  होईल असे बोलल्या जात आहे. शिवसेना धुम ठोकूण कामाला लागल्याचे दिसत आहे. भारीप बमसं मध्ये मोठ्या प्रमाणात खिंडार पडले आहे. भारीपच्या बैठकीत  राजकिय ‘दंगल’ बघावयास मिळाल्याने व त्यातच जेष्ठ नेते काँग्रेसच्या मार्गावर गेल्याने भारीपला मोठा धक्का पोहचणार असल्याची चर्चा आहे. इच्छूक उमेदवार  सावध पवित्रा घेवून आहेत. परंतू तयारी मात्र सुरु असल्याचे समजते. बुलडाणा पॅटर्न येथे चालेल काय? याची तपासणी सुरू आहे. तसेच भाजपामध्ये इच्छूकांची  मोठी यादीच असल्याने व मोदी पॅटर्न चालविले जात आहे. केंद्र व राज्यात मोदी सरकार भाजपाचे सध्या नगर परिषद भाजपाचे ताब्यात घेवून आमदारांनी एक  वेगळी छाप विधानसभेत निर्माण केली असल्याचे भासवून भाजपाचे उमदेवार जोरदार  सोशल मिडीयावर धूम ठोकत आहेत. बसपाचे अजुनही उमेदवारी निश्‍चीत  झाल्या नाहीत. परंतू जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीमध्ये सर्व जागा स्वतंत्र लढणार हे मात्र निश्‍चीत आहेत.
आता अफवांचा बाजार सूरू झाला आहे. यांचे तिकीट फायनल... त्याचे तिकीट फायनल... अमक्याचे तिकीट कापणार...ते तिकीट पूर्वी पासूनच  फायनल होते.. असे दावे प्रतिदो केल्या जात आहेत. सोशल मिडीयावर इच्छूकांच्या शर्यती सूूरू आहेत. त्यामध्ये पळशी झाशी-पातूर्डा व सोनाळा-बावणबीर हे  दोन गट जास्तीचे चर्चेत राहणार आहेत.
दे.महि (रंजित खिल्लारे) ः तालुक्यातील तिन जिल्हापरिषद गनासाठी येत्या काही दिवसात निवडणुकीचा रनसंग्राम तालुक्यातील --- आहे. या साठी सर्वच  पक्षांनी तसेच पक्षातील कार्यकत्यांनी उमेदवारीसाठी आपआपल्या पक्षाकडे मोर्चे बांधनी सुरू केली आहे. अनेक पक्षाचे इच्छुक उमेदवारांनी कॉर्नर बैठका तसेच  मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
दे.राजा तालूक्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळेल का?
परंतु सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपले कुठेतरी पक्षात स्थान असावे व पक्षाने आपल्याला कुठेतरी विचार करावा यासाठी  प्रयत्नात असतात परंतु ---- एखाद्या उमेदवाराचे नाव जर चर्चेत आले तर निष्ठावंत पक्षाचे कार्यकर्ते नारीज होतांना दिसत आहे. या साठी प्रत्येक पक्षांच्या पक्ष  श्रेष्टींनी उमेदवार देतांना तो उमेदवार पक्षाचा विष्टावंत तसेच पक्षातुन सामाजिक कर्ण करणारा व पक्षाचे धेय धोरणे जनसामाण्यांपर्यंत पोहचवणारा पहायला हवा  जेनेकरून पक्षाची तसेच पक्षश्रेष्टीची ताकत त्या ठिकाणी वाढेल व तसेच ----पक्षाने ---केलेल्या उमेदवारांना मतदार राजा तसेच कार्यकर्ते कितीपत  स्वीकारतात हे पाहणे ---- ठरेल परंतु खर्‍या अर्थाने विचार केला तर जन सामान्य मतदारराजामध्ये  कुठल्याही पक्षाने उमेदवारी देतांना उमेदवर हा निष्ठावंत  पक्षाचा कार्यकर्ता असला पाहिजेत असा सुर सर्वसामाण्य मतदारामधुन येत आहे. व तसेच ---आयात केलेल्या उमेदवाराला संधी दिल्यास जक्षातील बंडखोरांची  संख्या वाढण्याची भीती पक्षश्रेष्टींना असल्यामुळे पक्षश्रेष्टी निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी  देतात की ऐनवेळी आलेल्या उमेदवारांचा विचार करतात व त्याला मतदार  राजा कीतीपत स्विकारतो हे येणारा पुढील काळच ठरवेल.