Breaking News

मुलीच्या छेडछाड प्रकरणातून कापूसखेडमध्ये महिलेवर खुनी हल्ला

सांगली, दि. 03 - मुलीची छेड का काढली असा जाब विचारल्याच्या कारणांवरुन युवकाने त्याच्या अन्य दोन साथीदारांसह महिलेवर चाकूने सपासप वार करुन  गंभीर जखमी केल्याची घटना कापूसखेड (ता. वाळवा) येथे घडली आहे.  सुनिता रामचंद्र चव्हाण (वय 40) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव असून  त्यांच्यावर वसंतदादा पाटील शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान या प्रकरणी  हङ्घेखोर युवक व त्याच्या साथीदारांच्यावर कारवाई करावी अशी मागणीसांगली जिल्हा श्रमीक संघटनेच्या अध्यक्ष लिलाताई जाधव यांनी केली आहे. अन्यथा  इस्लामपूर पोलीसांना स्वस्थ बसू देणार नसल्याचा इशराही त्यांनी दिला आहे.
गत गुरुवारी (22 डिसेंबर) जखमी सुनिता चव्हाण यांच्या मुलीची छेड गावातीलच अमोल कोळी या युवकाने काढली होती. याचा जाब सौ. चव्हाण यांनी कोळी या  युवकाला विचारला होता. जाब विचारल्याने कोळी याला चव्हाण यांचा राग आला होता. या रागातच त्याने शुक्रवार 30 डिसेंबर रोजी रात्री साडे आठ वाजता अन्य  तीन साथीदारांना बरोबर घेत चव्हाण यांच्यावर चाकूने सपासप वार करुन खूनी हल्ला केला. यामध्ये चव्हाण या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पोट, डोके व  मांडीवर चाकूने पाच वार करण्यात आले आहेत. गंभीर अवस्थेत त्यांना इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन सांगली येथील वसंतदादा पाटील  शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तब्बल 370 टाके त्याना घालण्यात आले आहेत.  सद्या त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. अजूनही त्यांची प्रकृती चिंताजन आहे. दरम्यान एवढा सगळा प्रकार घडूनही इस्लामपूर पोलीसांनी मात्र  याकडे कानाडोळा केल्याचा आरोप सांगली जिल्हा श्रमीक संघटनेच्या अध्यक्षा लिलाताई जाधव यांनी केला आहे. हल्ल्याची माहीती इस्लामपूर पोलीसांना देऊनही  पोलीस शनिवारी दिवसभर सिव्हीलकडे फिरकले नाहीत. मुख्यमंत्र्याच्या दौर्‍याचे कारण सांगून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. यामुळे हङ्घेखोर अद्याप मोकाटच आहेत.
सुनिता चव्हाण यांच्यावर झालेल्या हङ्घयाची माहीती पोलीसांनी न घेतल्याने लिलाताई जाधव यांनी राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. या  घटनेची माहीती दिली. आ. चव्हाण यांनी या घटनेची गंभीर दखल घेत इस्लामपूर पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून कानउघडणी केल्याने रविवार 1 जानेवारी रोजी  इस्लामपूर पोलीसांनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये धाव घेत जखमी सुनिता चव्हाण यांचा जबाब घेतला. दरम्यान  या प्रकरणी लिलाताई जाधव यांनी रविवारी पोलीस  अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांची भेट घेऊन हङ्घेखोरांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसे निवेदनही त्यांनी दिले.
याबाबत बोलताना अध्यक्षा जाधव म्हणाल्या, पोलीसांच्या निष्काळजीपणाचा हा कळस आहे. एका महिलेवर चाकूने सापसप वार केले गेले,ख तरीही इस्लामपूर  पोलीसांनी या घटनेला गांभिर्याने घेतले नाही. मुख्यमंत्र्याच्या दौर्‍याचे कारण सांगत फोन बाजूला काढून ठेवला. नीट तक्रारही एकूण घेतली नाही. महिला  सुरक्षिततेचा डोंगारा पिटणार्‍या पोलीसांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. निर्भया पथकांचा नुसता गाजावाजा केला जात आहे. एका महिलेचा जीव घेण्याचा प्रयत्न  हल्लेखोरांनी केला आहे. येत्या पाच जानेवारी पर्यंत इस्लामपूर पोलीसांनी हङ्घेखोरांच्यावर कारवाई करुन त्यांना अटक करावी अन्यथा इस्लामपूर पोलीसांना स्वस्थ  बसू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी चंपाताई जाधव, जयश्री सावंत, कमल शिर्के, मगल् पाटील, गीता ठक्कर, आशा फडणवीस, सरीता कदम,  भागीरथी दळवी उपस्थित होते.