जिल्ह्यात 64 तळीरामांचे, नववर्षाचे स्वागत पोलिस ठाण्यात
सांगली, दि. 03 - थर्टी फर्स्टच्या रात्री दारु पिऊन सार्वजनिक ठिकाणी दंगा केल्याप्रकरणी जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 42 तळीरामांच्यावर पोलीसांनी कारवाई केली. सांगली व मिरज वाहतूक शाखेने सर्वाधिक 19 तळीरामांच्यावर कारवाई केली. दंड वसूल करुन समज देत तळीरांमांना साडून देण्यात आले. जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त लावल्याने थर्टी फर्स्टच्या रात्री कोठेही अनुचित प्रकार झाला नाही. 31 डिसेंबर अर्थात थर्टी फर्स्टच्या रात्रीचे महत्व लक्षात घेत जिल्हा पोलीस दलाच्या वतीने प्रङ्घचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुमारे 2 हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या सुरक्षेततेसाठी रस्त्यावर उतरले होते. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. ऑल आऊट ऑपरेशनच्या माध्यमातून पोलीसांची धिंगाना घालणार्या तरुणांच्यावर करडी नजर होती. दारु पिऊन दंगा कराल, तर जेल मध्ये जाल असा सज्जड इशाराच पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिला होता. यामुळे नव वर्षाचे स्वागत करताना तळीरामांनी कायदा मोडणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतल्याचे जाणपव होते. कुरळप, तासगाव, आष्टा, विटा, कुपववड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तसेच सांगली व मिरज वाहतूक शाखेने 42 तळीरामांच्यावर कारवाई करीत त्यांची झिंग उतरवली. त्यांच्याकडून दंड वसूल करीत त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. पोलीसांचा चौकाचौकात मोठा बंदोबस्त असल्याने कुठेही अनुचीत प्रकार झाला नाही.