Breaking News

आदर्श विद्यालयामध्ये वै.मामासाहेब दांडेकर स्मृती सोहळा

बुलडाणा, दि 17 - दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी वै.मामासाहेब दांडेकर स्मृती सोहळा भक्तीभावाने संपन्न झाला. आदर्श विद्यालयात दरवर्षी 4 जानेवारीला त्यांचा स्मृती सोहळा साजरा करित असतांना दिवसभर विविधि धार्मिक कार्यक्रम साजरा होत असतात. याहीवर्षी स्व.मामासाहेब दांडेकर स्मृती सोहळ्याची सुरूवात सकाळी ज्ञानेश्‍वरीच्या बाराव्या अध्ययनाचे वाचन करुन झाली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठाचे नेतृत्व ह.भ.प.लक्ष्मणबुवा सोळंकी यांनी केले तर संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण शेटे, सहसचि कैलाश शेटे, संस्थेचे जेष्ठ संचालक नानासाहेब बाहेकर, विद्यालयाचे प्राचार्य मदनराव देशमुख व सर्व शिक्षक बंधू भगिनी, कर्मचारी बंधू भगिनी, विद्यार्थी, विद्यार्थीनींनी ज्ञानेश्‍वरीचे वाचन केले. यानंतर हभप जगन्नाथ म्हस्के यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमात त्यांनी मामासाहेब म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व. कसं जगावं हे मामासाहेबांनी समाजाला शिकविले. सेवेकरी होवून समाजाची सेवा करावी. मानवाला जगण्यासाठी भौतिक ज्ञानासोबत अध्यात्मिक ज्ञानाचीही आवश्यकता असते आणि त्याच्याच माध्यमातून आपल्याला संसाररुपी भवसागरातून पोहून जाता येते असे सांगितले.
दूपारच्या सत्रात शि.प्र.म.चे अध्यक्ष रामकृष्ण शेटे यांच्या अध्यक्षतेखाली पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे जेष्ठ संचालक भाऊसाहेब लाहोटी, सचिव प्रेमराज भाला, सहसचिव कैलाश शेटे, रामदास निमावत, नानासाहेब बाहेकर, अण्णासाहेब डांगे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे नवनिर्वाचीत संचालक सुभाष मालाणी, शंकरराव शेटे, विशाल मिनासे यांचाही शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. स्मृती सोहळ्याची सांगता हभप हरिर्चतन्यजी स्वामी महाराज पळसखेड यांच्या किर्तनाने झाली. शवेटी सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, शिक्षक बंधू-भगिनी, कर्मचारी, विद्यालयाचे प्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांनी परिश्रम घेतले. यावेळी आयोजित विविध कार्यक्रमाचे सुत्र संचलन रामेश्‍वर कुटे यांनी केले.