Breaking News

विद्यार्थ्यांना पुस्तक वाटून तरूणाई फाउन्डेशनने केली स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंती साजरी

बुलडाणा, दि 17 - तरूणाई फाउन्डेशनचा तिसरा वर्धापनदिनी आवांतर खर्च न करता शाळेतील विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदाचे विचार वाचण्यासाठी संस्थेने शेकडो विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदाचे जिवनचारित्राचे पुस्तके जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वर्गीय राम मगर (अवयवदान ) च्या आई मंदाबाई मगर ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणुन तंटामुक्ती अध्यक्ष शिवप्रसाद मगर, डॉ.शिवशंकर बळी, नंदाताई बळी, भास्कर गवई, शाहिर जगदिश बोरकर, नारायन बळी, नंदाताई बळी, निलेश  गाभणे, आनंथा गिर्‍हे, हरिष गायकवाड, इ. उपस्थित होते. 
यावेळी  मान्यवरांनी स्वामी विवेकानंद व जिजाऊ मासाहेब यांच्या जिवनावर आपल्या भाषणातुन प्रकाश टाकला. व तरूणाई फाउन्डेशने अनाढायी खर्च न करता विद्यार्थ्यांना पुस्तके वाटण्याचा समाज उपयोगी उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. वर्धापन दिनानिमित्त संस्थेला शुभेच्छा दिल्या व पुढील समाज कार्यासाठी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.शिवशंकर बळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागोजी मगर, समाधान लाणकर, जयराम राऊत, गजानन तुपकर, जयराम बकाल, यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन तरूणाई फाउन्डेशनचे अध्यक्ष पत्रकार कैलास राऊत यांनी केले. कार्यक्रमाला गावकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.