Breaking News

दे.राजा तालुका पत्रकार संघाने उभारली माणुसकीची भिंत

बुलडाणा, दि. 30 - समाजातील उपेक्षीत घटकांना लाभ मिळवुन देण्यासाठी माणुसकीची भिंत उभारूण तालुका पत्रकार संघाने सामाजिक जानीवेची भावना  संवेदनशिल मनात पेटवुन देण्याचे कार्य केले. ह्या समाजोपयोगी कार्यासाठी असंख्य नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला असुन समाजातील गरजुंना आधार मिळाले  आहे.
तालुका पत्रकार संघ व राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन बस स्थानक परिसरात माणुसकीची भिंत अभारण्यात आली.  तहसीलदार मदन जाधव यांच्या हस्ते नारळ फोडुन व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मुशीरखान कोटकर यांनी फित कापुन सदर उपक्रमाचा शुभारंभ करण्यात  आला.
यावेळी आमदार डॉ.शशीकांत खेडेकर, डॉ.रामप्रसाद शेळके, ठाणेदार विजयसिंह राजपुत, प्रविण गिते, डॉ.शिंदे, अश्‍वीन सानप, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर,  मनोज कायंदे, यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य समाज बांधवांनी आपल्या कडील कपडे व जिवनावश्यक वस्तु माणुसकीच्या भिंती व आणुन लावले. ह्या साठी  राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक मेहतर, आगार प्रमुख जाधव, वाहतुक नियंत्रक शिवा जायभाये यांच्यासह तालुका पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी ह्या  सामाजिक उपक्रमासाठी पुढाकार घेतला. या प्रसंगी सतिश मोरे, राजेश इंगळे, डॉ.शंकर तलबे, मल्हार वाजपे, अनिल रामाणे, अभिजित शिंगणे, राजीव सिरसाठ,  एल.एम.शिंगणे, गणेश सवडे, प्रा.संजय देशमुख, मोरेश्‍वर मिनासे, जगदिश कापसे, सचिन व्यास, जहीर पठाण, यांच्यासह पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अर्जुन  आंधळे, गजानन घुगे, गजानन गोरे, गजानन तिडके, शिवाजी वाघ, प्रदिप हिवाळे, अशोक जोशी, गणेश डोके, दिनेश जाधव, विलास जगताप, सुनिल मतकर,  संतोष जाधव, म.जमील, राजु खांडेभराड, प्रविण काकडे, राजु पंडित, रमेश चव्हाण, सै.गफुर, यांची उपस्थिती होती. सचिव सुरज गुप्ता यांनी प्रास्ताविक केले.