Breaking News

मतदारांच्या जागृतीसाठी प्रयत्न करा ः विकास देशमुख

बुलडाणा, दि. 30 - अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दोन लाख दहा हजार मतदारांनी नाव नोंदणी केली आहे. ही मतदार यादी नव्याने केली  असल्याने यात नव मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या निवडणुकांमध्ये यंत्राचा वापर नसून बॅलेट पेपर असणार आहेत, त्यामुळे निवडणूक यंत्रणेत काम  करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांनी मतदारांचे बुथ क्रमांक, यादीतील नाव मतदारांपर्यंत मोबाईल प , वेबसाईट, एस. एम. एस. सारख्या विविध माध्यमातून  पोहोचवावे, असे आदेश कृषी आयुक्त तथा अमरावती पदवीधर मतदार संघाचे निवडणूक आयोगाचे निरीक्षक विकास देशमुख यांनी दिले.
अकोला जिल्ह्यात निवडणूक यंत्रणेत काम करणार्‍या सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांची नियोजन भवनच्या छत्रपती सभागृहात निवडणूक पूर्व तयारी आढावा बैठक  झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अमरावती विभागाचे आयुक्त जे. पी . गुप्ता, अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, वाशिमचे जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी,  अकोला महानगरपालिका आयुक्त अजय लहाणे उपस्थित होते.
अकोला जिल्ह्यातील मतदानासाठीचे निश्‍चित बुथ आहेत. पण शहरात एकूण 39 बुथ आहेत. एका केंद्रावर पाच बुथ असल्यामुळे मतदारांचा गोंधळ होवू शकतो, ते  टाळण्यासाठी बीएलओनी प्रत्येक मतदारांपर्यंत त्यांचे मतदान केंद्र, बुथ क्रमांक विविध माध्यमातून पोहोचवावेत. यासाठी विविध माध्यमाचा उपयोग करावा, असे  श्री. देशमुख आणि श्री. गुप्ता यानी यावेळी सांगितले.
मतदारांची यादी ुुु.रज्ञेश्रर.पळल.ळप वेबसाईटवर या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती श्री. श्रीकांत यांनी दिली. पदवीधर मतदारसंघ  निवडणुकीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती श्री.द्विवेदी यांनी दिली. दरम्यान मांगीलाल बाजोरिया हायस्कूलमधील मतदान केंद्रात एकूण पाच बुथ आहेत, त्याची  पाहणी निवडणूक निरीक्षक विकास देशमुख आणि आयुक्त जे.पी. गुप्ता यांनी केली.