Breaking News

शनिचा राशी पालट उत्सवाची महाप्रसादाने सांगता

बुलडाणा, दि. 30 - ग्रहांचा राजा समजल्या जाणार्‍या शनीदेव (ग्रह) दर 900 दिवसानंतर आपले इतर राशीतील स्थान बदलतो़ यावर्षी 26 जानेवारी रोजी  शनीदेवच्या राशीतील स्थान बदलानिमित्त शनी राशी पालट उत्सव येथील कारंजा चौकाजवळील शनीमंदीरात पार पडला़ आज 28 जानेवारी रोजी महाप्रसादाने  उत्सवाची सांगता करण्यात आली़  
नवग्रहामध्ये सर्वश्रेष्ठ असलेल्या शनी ग्रहाचे 26 जानेवारी रोजी स्थान पालट झाले़ यानिमित्त येथील शनी मंदीरात तेल स्नान, तेल अभिषेक, शनी वस्तु दान,   पुण्यजप, अनुष्ठाण, दर्शन आदि कार्यक्रम उत्सवादरम्यान पार पडले़ सकाळी 7 ते 9 दरम्यान होमहवन करण्यात आला़ त्यानंतर तेलाभिषेक करण्यात आले़  यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले़आज उत्सवाच्या सांगतेदिवशी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले़ सकाळी 11 वाजेला मंदीराचे पंडीत  मामराज यांच्या हस्ते महाप्रसाद वितरणाला सुरूवात झाली़ रात्री उशीरापर्यंत शहरासह परीसरातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला़
या उत्सव व महाप्रसाद वितरणात उमेश शर्मा, शामराज शर्मा, रविंद्र सोनकर, नरसिंग यादव, प्रदीप सहाणी, गणेश निसार आदींनी सहकार्य केले़ बद्रीसेठ पंजाबी  यांनी उत्सवाकरीता मोलाचे योगदान दिले़