Breaking News

मांजापासून अनेक पक्षांना जिवदान देणारे सातपुते

अहमदनगर, दि. 16 - तिळगुळ घ्या.. गोड गोड बोला.. असे सुचविणारा मकर संक्रांतीचा सण मानवी चुकांमुळे मात्र पक्षीजीवनावर आघात करणारा ठरू लागला  आहे. तो केवळ नायलॉन मांजामुळेच यावर्षी देखील नायलॉन मांजामुळे अनेक पक्षी गंभीर जखमी होऊन मृत पावले तर, नजरेस पडलेल्या काही जखमी पक्षांवर  मकर संक्रांत हा सण नाते जपणारा व मनातील कटुता मिटवणारा मानला जातो. या सणातील पतंगोत्सव आनंद द्विगुणित करतो. पण नायलॉन मांजा वापरामुळे  सध्यातरी या मांजामुळे पक्षांसह मानवावरही संक्रात कोसळल्याचे चित्र  दिसुन आले आहे. मानवावर डॉक्टरने तर पक्षांवर पक्षीमित्र असलेले सातपुते यांनी उपचार  करुन समाज हिताचे काम केले आहे. 
माणूस जखमी झाला तर, त्याला लगेज आजूबाजूचे लोक दवाखान्यात नेतात. गंभीर असेल तर रुग्णवाहिका उपलब्ध करून देतात. पण झाडांवर, तारांवर,  जमिनीवर मांज्यामुळे अडकून जखमी झालेल्या पक्षांच्या भावनांकडे कोण लक्ष देणार? अशा अपघातांमध्ये सापडलेल्या पक्षांच्या घरट्यांमध्ये त्यांची चिमुकली  पिल्लेही आपल्या आईवडिलांची वाट पहात अखेरचा श्‍वास घेतात. याची दखल घेत भिंगारचे पक्षी अभ्यासक ताथा शिक्षक जयराम सातपुते व शिवकुमार वाघुंबरे  आपल्या पक्षीमित्रांसह नगर जिल्ह्यात दरवर्षी जखमी पक्षांसाठी हेल्पलाईन राबवित आहेत. यावर्षीही त्यांनी हा उपक्रम राबवत जखमी पक्षांवर पशुवैद्यकीय  दवाखान्यांच्या मदतीने उपचार करून त्यांना पुन्हा निसर्गात मुक्त केले.
पिंगळा, घुबड, होला, पारवा, हरियल, पांगोळी, बगळे, कावळा अशा अनेक अनेक पक्षांवर त्यांनी यशस्वी उपचार केले गेले असले तरी गंभीररित्या जखमी होऊन  मृत झालेल्या पक्षांची संख्या यावेळी वाढल्याचे त्यांनी सांगितले. नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली होती याउपरही अनेकांना या मांजामुळे जखमा झाल्या  होत्या मात्र मनपाने याकडे सर्रास यंदा दुर्लक्ष केल्याचे खंत आहे.