Breaking News

कविता ही प्रत्येकाच्या मनात रुजलेली असते : चंद्रकात पालवे

। श्रीनाथ विद्या मंदिरचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

अहमदनगर, दि. 16 - कवी होण्यासाठी शिक्षण घेण्याची गरज नाही, कारण प्रत्येकाच्या मनात कविता ही रुजलेली असते, फक्त ती कोणाच्यातरी ओठावरच येते.  आई विषयी कितीही कविता मनामधून ओठावर आल्या तरी त्या कवितेला अंत नसतो. आई विषयी कितीही कविता सांगितल्या तरी त्या संपणार नाहीत, असे  प्रतिपादन कवी चंद्रकांत पालवे यांनी केले.
सेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीनाथ विद्या मंदिराचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी अध्यक्षीय भाषणात कवी पालवे  बोलत होते. प्रमुख पाहुणे निवृत्त प्राचार्य दादासाहेब भोईटे हे होते.
कवी पालवे पुढे म्हणाले, कवी होण्यासाठी मला काहीच शिकावे लागले नाही. मनात रुजलेल्या भावना ओठावर आल्या की कविता तयार होते. नेवासा येथील  ज्ञानेश्‍वरांच्या पावनभूमीत माझ्या कवितांचा प्रारंभ झाल्याने ज्ञानाचे मोठे भांडार मला मिळाले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाला महत्वाचे द्यावे शिक्षण ही अशी विद्या आहे की,  यामधून जीवन जगण्याचा अर्थ समजतो. कविता ही लिखाणातून तयार होत  नाही तर आपण सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत दिवसभरातील जे जीवन जगतो  ती एक कविता असते, असे चंद्रकांत पालवे यांनी शेवटी सांगितले.
प्रमुख पाहुणे दादासाहेब भोईटे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, सध्या स्पर्धेचे युग आहे, प्रत्येक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी  शिक्षणाला महत्व द्या. शैक्षणिक ज्ञान जास्तीत जास्त आत्मसात करा. शिक्षक जे ज्ञान देतात ते कुठेच मिळत नाही. विद्यार्थ्यांनी भावी जीवनात यशस्वी  होण्यासाठी चांगले करीअर घडविण्यासाठी प्रत्येक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा, असे आवाहन प्रा.भोईटे यांनी केले.
प्रास्ताविक भाषणात मुख्याध्यापिका सौ.ए.बी.सिद्दम यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशामुळे शाळेचे नाव  प्रगतीपथावर आहे. संस्थेच्या सर्व पदाधिकार्‍यांचे लक्ष सातत्याने शैक्षणिक गुणवत्ता कशी टिकेल वाढेल असल्याने संस्थेची प्रगती व शाळेचे नाव विद्यार्थ्यांमुळे होत  असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास संस्थेचे विश्‍वस्त आर.डी.बुचकुल, आर.ए.देशमुख, देवदत्त पाउलबुद्धे तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या रेखाराणी खुराणा, डि.एड.च्या  प्राचार्या सविता सानप, डि.फार्मसी कॉलेजच्या प्राचार्य अनुराधा चव्हाण, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका कल्पना लवांदे, नराल मॅडम, संभार मॅडम आदि उपस्थित  होते. सुत्रसंचालन ससे मॅडम यांनी केले. तर आभार मारवाडी मॅडम यांनी मानले.