Breaking News

खरसुंडी येथे महिलेवर हल्ला, दागिने लंपास

सांगली, दि. 14 -  खरसुंडी-बाळेवाडी (ता. आटपाडी) रस्त्यावरील कोळेकर वस्तीवर चोरट्यांनी महिलेवर हल्ला करुन चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास  केले. दुपारी भरदिवसा ही घटना घडली. मुक्ताबाई वसंत कोळेकर (55) असे जखमी महिलेचे नांव आहे. कोळेकर या घरी एकट्याच होत्या. त्यावेळी दोन  अनोळखी तरुम एर एक महिला पाणी पिण्याचा बहाणा करुन घरी आले. त्यांनी मुक्ताबाई यांच्यावर हल्ला करुन, त्यांच्या कानातील कर्णफुले, गंठण, मंगळसूत्र  लंपास केले. त्यांना बेदम मारहाणही केली. या मारहाणीमुळे त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून हाताला जोराचा मार लागला आहे. दोन्ही कानाला व  तोंडावरही जखम झाली आहे. त्यांच्यावर खरसुंडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.  चोरट्यांच्या शोधासाठी नाकाबंदीही करण्यात आली. पण त्यांचा सुगावा लागला नाही. खरसुंडीची यात्रा चालू झाली असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे  वातावरण आहे. आटपाडी पोलिसात या घटनेची नोंद आहे. अधिक तपास के. एस. पुजारी अधिक तपास करीत आहेत.