Breaking News

अपघातग्रस्त टँकरमधील तेलाची पळवा-पळवी

खटाव, दि. 14 (प्रतिनिधी) : वडूज-दहिवडी रस्त्यावर गुरुवारी पहाटे टँकर पलटी झाला. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान या  टँकरमधून तेल गळत असल्याने ते भरून नेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
दहिवडीकडून वडूजकडे हा टँकर (एमएच 46 एएफ 5984) येत असताना पहाटेच्या सुमारास उतारावर टँकर रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाला. हा टँकर  खाद्यतेलाचा असल्याने टँकरमधून तेलाची गळती होत होती. त्यामुळे नागरिकांनी टँकरमधून गळणारे तेल घेण्यासाठी   गर्दी केली होती. काही वेळाने त्याठिकाणी  पोलीस आल्यानंतर पोलिसांनी नागरिकांना हटविले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला टँकर व्यवस्थित उभा करण्यात आला. घटनास्थळी पोलीस  निरीक्षक यशवंत शिर्के, हवालदार शांतीलाल ओंबासे, अमोल जगदाळे, बाबर उपस्थित होते.